
कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रयत्न केल्यानंतर आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला कोरोनाचा फटका बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे फिजीओ पॅट्रीक फराहत यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्शलाही कोविडची लागण झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवर 20 तारखेला पुण्याच्या गहुंजे स्टेडीअमवर होणारा दिल्ली विरुद्ध पंजाब सामना आता मुंबईच्या ब्रेबॉन मैदानावर खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर मिचेल मार्शला कोविडची लागण झाल्यानंतर त्याला खबरदारीचा उपाय म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीच्या संघातील इतर खेळाडूंची कोविड चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना पंजाब विरुद्ध दिल्ली सामना ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होईल अशी अपेक्षा आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील सदस्यांची आता उद्या आणखी एक कोरोना चाचणी होणार आहे. या चाचणीच्या निकालावर दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
मिचेल मार्शसोबत दिल्ली कॅपिटल्स संघातील इतर सहकारी सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना कोणतीही लक्षणं जाणवत नसली तरीही वैद्यकीय टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. मिचेल मार्शची रॅपिड अँटीजेन टेस्ट झाली तेव्हा त्याला कोविडची लक्षणं जाणवत होती. ज्यानंतर त्याची RTPCR टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे.