
India Vs Australia 1st Odi : टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहूलला (kl Rahul) सुर गवसला असून त्याने 75 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय मिळवून दिला आहे. टीम इंडियाने (Team India) 5 विकेट आणि 61 बॉल राखून हा विजय मिळवला आहे. राहूलला रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) 45 धावांची साथ मिळाली त्यामुळे हा विजय साकारता आला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीय.(ind s aus 1st odi kl rahul 75 score team india won bye 5 wicket against australia)
टीम इंडियाचा कर्णधार हार्दीक पंड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजीला उतरली होती. ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का ट्रेविस हेडच्या रूपाने बसला होता.तो 5 धावा करून बाद झाला होता. मात्र मिचेल मार्श तुफान फॉर्ममध्ये होता. एका बाजून तो तुफान फटकेबाजी करत होता, तर दुसऱ्या बाजूला एका मागून एक विकेट पडत होते. मार्शला सोडून एकाही खेळाडूला 30 धावाचाही आकडाही गाठता आला नाही. मिचेल मार्शने 81 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 10 फोर आणि 5 सिक्स मारले होते.या त्याच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलिया 188 धावापर्यंत पोहोचली होती. मार्शची विकेट जाताच ऑस्ट्रेलिया 35 ओव्हरमध्ये ऑल आऊट झाली होती.
ऑस्ट्रेलियाने (Australia) दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडि्याचीही सुरुवात चांगली झाली नव्हती. सलामीवीर ईशान किशन स्वस्तात बाद झाला. तर शुबमन गिल 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर एका मागोमाग एक दोन विकेट पडले. विराट कोहली 4 वर तर सुर्यकुमार यादल शुन्य धावा करून आऊट झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या के एल राहूलने डाव सांभाळला होता.
के एल राहूलने (KL Rahul) एका बाजूने डाव सांभाळत टीम इंडियाला विजयाच्या दिशेने ढकलंल, त्याला रविंद्र जडेजाची चांगली साथ मिळाली. के एल राहूलने नाबाद 75 धावा केल्या.या खेळीत त्याने 7 फोर आणि एक सिक्स लगावला. रविंद्र जडेजाने नाबाद 45 धावा केल्या.या खेळीत त्याने 5 फोर लगावले. या दोघांच्या तुफान खेळीने टीम इंडियाने 5 विकेट आणि 61 बॉल राखून ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला.
तीन सामन्याच्या वनडे मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उस्तुकता आहे.