Richard Kettleborough : वर्ल्ड कप टीम इंडिया हरली, पण अंपायर का होतोय ट्रोल? - ind vs aus final world cup 2023 richard kettleborough trolls after team india loss panauti - MumbaiTAK
बातम्या स्पोर्ट्स

Richard Kettleborough : वर्ल्ड कप टीम इंडिया हरली, पण अंपायर का होतोय ट्रोल?

टीम इंडियाच्या पराभवानंतर रिचर्ड केटलब्रो खुप चर्चेत आहे. केटलब्रो यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. फायनल सामन्यात केटलब्रोचे काही निर्णय वादग्रस्त ठरले आहेत.
ind vs aus final world cup 2023 richard kettleborough trolls after team india loss panauti

Panauti Richard Kettleborough and Team India: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Stadium) रंगलेल्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा पराभव करत सहाव्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरले. या पराभवानंतर टीम इंडियाचे (Team India) स्वप्न भंगले आहे. टीम इंडियाच्या या पराभवानंतर सोशल मिडीयावर खेळाडूंना ट्रोल करण्यात येत आहे. या खेळाडूंसोबत एक अंपायरही ट्रोल होतोय. या अंपायरचे नाव रिचर्ड केलटब्रो  (Richard Kettleborough) आहे. या रिचर्ड केलटब्रोचे टीम इंडियाच्या पराभवाशी काय कनेक्शन आहे? हे जाणून घेऊयात. (ind vs aus final world cup 2023 narendra modi stadium richard kettleborough trolls after team india loss panauti)


टीम इंडियाच्या पराभवानंतर रिचर्ड केटलब्रो खुप चर्चेत आहे. केटलब्रो यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. फायनल सामन्यात केटलब्रोचे काही निर्णय वादग्रस्त ठरले आहेत.एका प्रसंगी केटलब्रोने मार्नस लॅबुशेनविरुद्धचे एलबीडब्ल्यू अपील नाकारले. भारताने रिव्ह्यू घेतला, पण तो अंपायरचा कॉल निघाला. त्या प्रसंगी कॅटलबरोने लॅबुशेनला बाद केले असते तर भारताला यश मिळाले असते.

हे ही वाचा : Ind vs Aus Final Analysis: …म्हणून टीम इंडियाचा अंतिम सामन्यात झाला ‘गेम’, पराभवाची 5 मोठी कारणं

चाहत्यांच्या म्हणण्यानूसार, रिचर्ड केटलब्रो ज्या ज्या मोठ्या सामन्यात भारताविरूद्ध अंपायर राहिले आहेत, त्या त्या वेळी भारताचा पराभव झाला आहे. एका चाहत्याने ट्विटरवर पोस्ट केलेल्या आकडेवारीनुसार, 2014 पासून 2023 वर्ल्ड कपपर्यंत झालेल्या टूर्नामेंटमधील जवळपास सर्व नॉकआउट सामन्यांमध्ये रिचर्ड किटलबरोने मैदानावरील पंच राहिले आहेत. या अंपायरमुळेच भारताने 2014 ची वर्ल्ड कप फायनल, 2015 ची वर्ल्ड कप सेमी फायनल, 2016 टी20 वर्ल्ड कप सेमीफायनल, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल, 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपध्ये आणि 2O23 चा वर्ल्ड कप देखील गमावला आहे.

हे ही वाचा : Chandrapur : भाजप नेत्यासह तिघांचा मृत्यू, अस्थिविर्सजन करतानाच काळाने घातली झडप

विशेष म्हणजे टीम इंडिया ज्या ज्या वेळेस फायनल पर्यंत पोहोचली आहे. त्या फायनल सामन्यात केटलब्रोने पंचाची भूमिका साकारली आहे. आणि त्याच्या वादग्रस्त निर्णयामुळे भारतावर पराभवाची नामुष्कीही ओढवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एक्स या सोशल माध्यमावर #Panauti च्या ट्रेंड खाली केटलब्रो यांना ट्रोल केले जात आहे.

ICC टुर्नामेंटमध्ये 2013 नंतरची भारताची कामगिरी

2014- T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव
2015- वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पराभव
2016- T20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पराभव
2017- चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पराभव
2019- वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पराभव
2021- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल हरली
2022- T20 ववर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पराभव
2023- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल हरले
2023- वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पराभव

विस्मरणाचा असेल आजार तर एवढंच करा दुधामध्ये फक्त ‘ही’ चार पानं टाका Tadoba: सगळ्यांसमोर भिडले दोन वाघ, रक्तबंबाळ झाले अन्.. दररोज Squats करा; मिळतील ‘हे’ 7 अप्रतिम फायदे! फिरायचा प्लान करताय? मुंबईपासून काही अंतरावर असलेली ‘ही’ ठिकाणं करा Explore रम आणि ब्रँडीमध्ये ‘हा’ आहे फरक… ‘या’ 5 टेक्निक्सने Hip Fat झटपट करा दूर! Team India सोबत विमानात कोण होती ती ‘मिस्ट्री गर्ल’, पाहा PHOTO सनी देओल दिसला दारूच्या नशेत, व्हिडीओ व्हायरल… ‘Animal’ मध्ये रणबीरसोबत रोमान्स, अभिनेत्रीचा ग्लॅमरस-हॉट लुक पाहिला का? Top 10 बेस्ट केटो डाएट फॉलो करून करा Weight Loss Weight Loss: महिन्याभरातच कसं व्हायचं स्लिम-फिट? दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? Archies: नातवाचा ग्रँड डेब्यू; धाकट्या भावासोबत पहिल्यांदाच दिसले अमिताभ बच्चन! गाजराचा हलवा बनवताय? मग लक्षात ठेवा ‘या’ छोट्या टिप्स… डॉ. बाबासाहेबांबद्दल 10 खास गोष्टी, तुम्हाला किती माहितीये? तुमचं सौंदर्य चाळीशीतही राहील सुंदर अन् निरागस; फक्त ‘या’ 3 गोष्टी नेहमी करा फॉलो! Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात