IndvsEng : ‘हिटमॅनला’ सूर गवसला, चेन्नई टेस्ट मॅचमध्ये दमदार शतक

मुंबई तक

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये मुंबईकर रोहित शर्माने पहिल्याच दिवशी दमदार सेंच्युरी झळकावत भारताची बाजू भक्कम केली आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच सेशनमध्ये चेपॉकचं पिच स्पिनर्सना मदत करत होतं. गिल आणि विराट कोहलीला शून्यावर आऊट करत इंग्लंडने चांगली सुरुवात केली. पण रोहित शर्माने एक बाजू लावून धरत इंग्लंडच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये मुंबईकर रोहित शर्माने पहिल्याच दिवशी दमदार सेंच्युरी झळकावत भारताची बाजू भक्कम केली आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच सेशनमध्ये चेपॉकचं पिच स्पिनर्सना मदत करत होतं. गिल आणि विराट कोहलीला शून्यावर आऊट करत इंग्लंडने चांगली सुरुवात केली. पण रोहित शर्माने एक बाजू लावून धरत इंग्लंडच्या बॉलर्सचा चांगला सामना केला.

महत्वाची गोष्ट म्हणजे जिकडे टीम इंडियाचे इतर बॅट्समन इंग्लंडच्या ट्रॅपमध्ये अडकत होते तिकडे रोहितने स्वतःच्या गेमवर विश्वास ठेवत टेस्ट करिअरमधलं आपलं सातवं शतक झळकावलं. इंग्लंडविरुद्ध टेस्ट, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सेंच्युरी करणारा रोहित शर्मा दुसरा प्लेअर ठरला आहे.

२०२० प्रमाणे २०२१ या वर्षातही रोहित शर्मा भारताकडून पहिल्यांदा सेंच्युरी करणारा प्लेअर ठरला आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्माचा फॉर्म हा चिंतेचा विषय बनला होता…पण महत्वाच्या क्षणी ज्यावेळी संघाला आपली गरज होती तिकडे बहारदार इनिंग खेळत रोहितने चेन्नईच्या मैदानावर शतक झळकावलं. रोहितचा मुंबईकर साथीदार आणि व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेनेही रोहितला चांगली साथ दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp