ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंदूर कसोटीत भारतीय संघाचा 9 विकेट्सनी पराभव झाला. हा सामना तिसऱ्या दिवशीच पहिल्या सत्रात संपला.
यावरून खेळपट्टीवर बोललं जात आहे. अनेक दिग्गजांनी खेळपट्टीबद्दल आपले मत व्यक्त केले आहेत.
मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) खेळपट्टीबाबत मोठी कारवाई केली आहे. ICC ने इंदूरच्या खेळपट्टीला ‘खराब’ रेटिंग दिली आहे.
ही रेटिंग आयसीसीच्या खेळपट्टी आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंग प्रक्रियेअंतर्गत देण्यात आली आहे.
यासोबतच मॅच रेफरीच्या अहवालानंतर इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमला तीन डिमेरिट पॉइंट्सही देण्यात आले आहेत.
आयसीसीचे मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी दोन्ही संघांचे अधिकारी आणि कर्णधारांशी सामन्याबाबत चर्चा केली होती.
ख्रिस ब्रॉड म्हणाले, ‘खेळपट्टी खूप कोरडी होती. यावर फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात संतुलन राहिले नाही. सुरुवातीपासून स्पिनर्सला मदत मिळाली आणि अस्मान उसळी मिळाली.