IPL 2021 : KKR अंतिम फेरीत आल्यामुळे CSK च्या चिंता वाढल्या, फायनलचा इतिहास कोलकात्याच्या बाजूने
दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात KKR ने अटीतटीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यात विजेतेपदाची लढाई होणार आहे. परंतू या लढाईआधी चेन्नईच्या संघासमोर चिंता वाढल्या आहेत. यंदाच्या हंगामात चेन्नईचा संघ चांगल्याच फॉर्मात आहे, असं असतानाही इतिहासातली एक आकडेवारी CSK साठी धोकादायक ठरु शकते. IPL 2021 : KKR जितबो रे…अंतिम […]
ADVERTISEMENT

दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात KKR ने अटीतटीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यात विजेतेपदाची लढाई होणार आहे. परंतू या लढाईआधी चेन्नईच्या संघासमोर चिंता वाढल्या आहेत.
यंदाच्या हंगामात चेन्नईचा संघ चांगल्याच फॉर्मात आहे, असं असतानाही इतिहासातली एक आकडेवारी CSK साठी धोकादायक ठरु शकते.
IPL 2021 : KKR जितबो रे…अंतिम फेरीत चेन्नईसोबत विजेतेपदासाठी लढणार
अंतिम फेरीत प्रवेश करण्याची चेन्नईची ही नववी वेळ ठरली आहे. याआधीच्या ८ पैकी ३ वेळा चेन्नईच्या संघाने स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे. पण या तुलनेत कोलकाता नाईट रायजर्सचा संघ दोनदा अंतिम फेरीत दाखल झाला होता आणि या दोन्ही वेळी कोलकात्याने स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. २०१२ आणि २०१४ सालची विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर जमा आहेत.