IPL 2021 : हर्षल पटेलची हॅटट्रीक, मुंबईचा सलग तिसरा पराभव, RCB चा रथ विजयपथावर

मुंबई तक

हर्षल पटेलने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या हॅटट्रीकच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ अखेरीस विजयपथावर आला आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ५४ रन्सनी मात करत RCB ने आपलं आव्हान कायम राखलं आहे. विजयासाठी मिळालेल्या १६६ रन्सचा पाठलाग करताना मुंबईचा डाव १११ धावांवर संपुष्टात आला. आयपीएलच्या इतिहासात RCB कडून हॅटट्रीक करणारा हर्षल पटेल तिसरा बॉलर ठरला आहे. याआधी प्रवीण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

हर्षल पटेलने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या हॅटट्रीकच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ अखेरीस विजयपथावर आला आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ५४ रन्सनी मात करत RCB ने आपलं आव्हान कायम राखलं आहे. विजयासाठी मिळालेल्या १६६ रन्सचा पाठलाग करताना मुंबईचा डाव १११ धावांवर संपुष्टात आला.

आयपीएलच्या इतिहासात RCB कडून हॅटट्रीक करणारा हर्षल पटेल तिसरा बॉलर ठरला आहे. याआधी प्रवीण कुमार आणि सॅम्युअल बद्रीने RCB कडून हॅटट्रीक केली आहे. याच हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात हर्षल पटेलने मुंबईविरुद्ध सामन्यात ५ विकेट घेतल्या होत्या. आज त्याच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध हर्षलने हॅटट्रीक घेत आपलं महत्व सिद्ध केलं आहे.

सामन्यात पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या RCB ची सुरुवात खराब झाली. सलामीवीर देवदत पडीक्कल बुमराहच्या बॉलिंगवर शून्यावर आऊट झाला. यानंतर कॅप्टन कोहली आणि के.एस.भारतने संघाचा डाव सावरला. विराटने मुंबईच्या बॉलर्सवर हल्लाबोल करत संघाची बाजू मजबूत केली. दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची पार्टनरशीप केल्यानंतर भारत राहुल चहरच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलनेही विराटला चांगली साथ देत मुंबईच्या बॉलर्सचा समाचार घ्यायला सुरुवात केली.

यादरम्यान विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ही जोडी मैदानात रंगात आलेली असतानाच मिल्नेने विराटला अर्धशतकाचा आनंद साजरा करु दिला नाही. ५१ धावांची इनिंग खेळून तो माघारी परतला. यानंतर RCB च्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांवर अंकुश लावत मुंबईने प्रतिस्पर्धी संघाला १६५ धावांवर रोखलं. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने ३ तर ट्रेंट बॉल्ट-मिल्ने-चहर यांनी १-१ विकेट घेतली.

हे वाचलं का?

    follow whatsapp