IPL सामन्यांच्या Broadcasting Rights मधून BCCI कमावणार एवढी रक्कम, आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसेल

2023-2027 या कालावधीसाठी BCCI आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांचा लिलाव करणार
IPL सामन्यांच्या Broadcasting Rights मधून BCCI कमावणार एवढी रक्कम, आकडा पाहून तुम्हालाही धक्का बसेल
फोटो सौजन्य - आयपीएल

आयपीएलचा चौदावा हंगाम नुकताच युएईत संपन्न झाला. चेन्नई सुपरकिंग्जने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर मात करत आपलं चौथं विजेतेपद मिळवलं. चौदावा हंगाम संपल्यानंतर बीसीसीआयने लागलीच पुढच्या हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. पुढच्या वर्षी आयपीएलचं मेगा ऑक्शन होणार असून दोन नवीन संघ आयपीएलमध्ये सहभागी होतील. तसेच बीसीसीआय आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांचाही लिलाव करण्याच्या तयारीत आहे.

२०२३ ते २०२७ या कालावधीसाठी बीसीसीआय आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क देणार आहे. या हक्कांच्या लिलावातून बीसीसीआयला 5 Billion US Dollars एवढा फायदा होणार आहे. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत ३ लाख ६० हजार कोटी इतकी जाते आहे.

सध्याच्या घडीला आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क हे Star India कंपनीकडे आहेत. परंतू आयपीएल बिडींग प्रोसेसच्या संबधित व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बीसीसीआयला १६ हजार ३४७ कोटींचा फायदा होतो आहे. हा फायदा पुढील लिलावात दुपटीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील एका कंपनीनेही आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क विकत घेण्यासाठी रस दाखवला आहे.

पुढच्या हंगामात आयपीएल १० संघांनिशी खेळवलं जाणार आहे. त्यामुळे सामन्यांची संख्याही वाढवली जाईल. त्यामुळे सामन्यांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे बीसीसीआयला होणारा फायदाही वाढू शकतो अशी माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना दिली. त्यामुळे २०२३ ते २०२७ या काळातले प्रसारणाचे हक्क कोणत्या कंपनीकडे जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in