Ind vs SA : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

२६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्याला होणार सुरुवात
Ind vs SA : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

टीम इंडियाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात नियोजीत वेळापत्रकानुसार टीम इंडिया ३ कसोटी, ३ वन-डे आणि ४ टी-२० सामने खेळणार होती. परंतू ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आता टी-२० मालिका पुढे ढकलण्यात आली असून दोन्ही संघ फक्त कसोटी आणि वन-डे सामने खेळतील.

२६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्याचं सुधारित वेळापत्रक नुकतच जाहीर करण्यात आलं आहे.

  • पहिला कसोटी सामना - २६ ते ३० डिसेंबर - सेंच्युरिअन

  • दुसरा कसोटी सामना - ३ ते ७ जानेवारी - जोहान्सबर्ग

  • तिसरा कसोटी सामना - ११ ते १५ जानेवारी - केप टाऊन

  • पहिला वन-डे सामना - १९ जानेवारी - बोलंड पार्क, पार्ल

  • दुसरा वन-डे सामना - २१ जानेवारी - बोलंड पार्क, पार्ल

  • तिसरा वन-डे सामना - २३ जानेवारी - केप टाऊन

सध्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे तयार झालेली परिस्थिती पाहता या दौऱ्यात बदल करणं गरजेचं असून याबद्दल दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी चर्चा झाल्याचंही बीसीसीआयने सांगितलं. या दौऱ्यात सर्व खेळाडू हे कठोर बायो सिक्युअर बबलमध्ये वावरणार आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी विशेष चार्टर्ड विमानाची सोय केली जाणार असल्याचंही बीसीसीआयने सांगितलं आहे.

Ind vs SA : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
Omicron ची भीती, टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बदल; टी-२० सामने नंतर खेळवणार

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in