Babar Azam: हनी ट्रॅपच्या कथित प्रकरणानंतर बाबर आझमचा पहिलं ट्विट

Babar Azam Tweet: बाबर आझमचे काही पर्सनल व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर लीक झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र याच दरम्यान बाबर यांनी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे
हनी ट्रॅप आणि बाबर आझमचे पहिले ट्विट
हनी ट्रॅप आणि बाबर आझमचे पहिले ट्विटMumbai Tak

Babar Azam Honey Trap: कराची: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सतत अडचणीत येत आहे. मायदेशात एकदिवसीय आणि कसोटी मालिका गमावल्यानंतर आता त्याच्या कर्णधारपदावरही बोटे उचलली जात आहेत. आता त्याचे काही वैयक्तिक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर लीक झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र याच दरम्यान बाबर यांनी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.

सोशल मीडियावर काही वैयक्तिक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये बाबर आझम दिसत असल्याचा दावा केला जात आहे. यानंतर काही युजर्सनी बाबरला प्रचंड ट्रोल केले, तर काही चाहत्यांनी बाबरचे समर्थनही केले.

ट्विटरवर @niiravmodi अकाऊंटवरून सर्वप्रथम एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यात आला. असा दावा करण्यात आला आहे की व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती बाबर आझम असून तो एका मुलीसोबत व्हिडिओ चॅट करताना दिसत आहे. एका इंस्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला होता, जो eish.arajput1 अकाऊंटने शेअर केल्याचे दिसते. बाबर यांनी याप्रकरणी अद्याप काहीही सांगितलेले नाही.

पण आता याच दरम्यान बाबरने त्याच्या कूल लूकचा एक फोटो शेअर केला आहे. पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबरने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत बाबर नदीच्या काठावर बसलेला दिसत आहे. तसेच पोस्टमध्ये लिहिले की, 'आनंदी होण्यासाठी फार काही लागत नाही.' यावर प्रतिक्रिया देताना काही युजर्सनी बाबर बरा होण्याची आशाही व्यक्त केली.

बाबरवर लैंगिक शोषणाचा आरोप

याआधी बाबर आझमवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. लाहोरमधील हमिजा मुख्तार या महिलेने तिच्या तक्रारीत बाबरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला, तिला गर्भपात करण्यास भाग पाडले आणि लग्नाचे खोटे आश्वासन दिले, असा आरोप तिने केला होता.

हमिजा आणि बाबर एकाच शाळेत शिकत होते

पीडितेने सांगितले की, 'मी आणि बाबर एकाच शाळेत शिकायचो. आम्ही एकाच वस्तीत राहत होतो. त्याने मला प्रपोज केले आणि मी ते स्वीकारले. त्यावेळी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली नव्हती. हमिजा म्हणाली, 'बाबरची 2014 मध्ये राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली होती. त्याच्या वागण्यात हळूहळू बदल होऊ लागला. पुढच्या वर्षी पुन्हा त्याला लग्नासाठी विचारले, पण त्याने पुन्हा नकार दिला. 2015 मध्ये बाबरला मी गरोदर असल्याचे सांगितले. घरातून पळून आल्यामुळे मी माझ्या घरी परत जाऊ शकले नाही. बाबरने त्याच्या मित्रांसोबत मिळून गर्भपात करून घेतला, असं हमिजा म्हणाली.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in