IPL 2021 : 292 खेळाडू लिलावात उतरणार, अर्जुन तेंडुलकरलाही संधी
आयपीएल २०२१ साठी पार पडणाऱ्या लिलावासाठी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने २९२ खेळाडूंची यादी निश्चीत केली आहे. अंतिम तारखेपर्यंत १०९७ खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी आपलं नाव रजिस्टर केलं होतं. टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर हरभजन सिंह, अष्टपैलू केदार जाधव, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल यासारख्या प्रमुख खेळाडूंची लिलावासाठीची रक्कम २ कोटी इतकी निश्चीत करण्यात आली आहे. अवश्य वाचा – […]
ADVERTISEMENT
आयपीएल २०२१ साठी पार पडणाऱ्या लिलावासाठी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने २९२ खेळाडूंची यादी निश्चीत केली आहे. अंतिम तारखेपर्यंत १०९७ खेळाडूंनी आयपीएल लिलावासाठी आपलं नाव रजिस्टर केलं होतं. टीम इंडियाचा अनुभवी स्पिनर हरभजन सिंह, अष्टपैलू केदार जाधव, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल यासारख्या प्रमुख खेळाडूंची लिलावासाठीची रक्कम २ कोटी इतकी निश्चीत करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
अवश्य वाचा – VIVO कंपनी IPL ची साथ सोडणार, BCCI नवीन स्पॉन्सरच्या शोधात
आयपीएलच्या चौदाव्या सिझनासठी ८ संघांना मिळून ६१ जागा भरायच्या आहेत. २९२ प्लेअर्सच्या यादीत १६४ प्लेअर्स भारतीय, १२५ प्लेअर्स परदेशी तर ३ प्लेअर्स हे असोसिएट देशांचे आहेत. १८ तारखेला चेन्नईत आयपीएलच्या चौदाव्या सिझनचा लिलाव पार पडला जाणार आहे. विराट कोहलीच्या RCB संघाकडे १३ खेळाडूंची जागा असल्यामुळे यंदाच्या लिलावात RCB चांगल्या खेळाडूंना विकत घेण्याच्या तयारीत असेल. सनराईजर्स हैदराबादच्या संघात फक्त ३ जागा शिल्लक आहेत, त्यामुळे हा संघ कोणत्या खेळाडूंना संधी देतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पंजाबच्या संघाकडे सध्या ५३ कोटी १० लाख इतकी रक्कम शिल्लक असून हैदराबादच्या संघाकडे ११ कोटी ७५ लाख इतकी रक्कम शिल्लक आहे.
हे वाचलं का?
अवश्य वाचा – मराठमोळा माजी क्रिकेटर करणार विराटच्या RCB ला मदत
चेन्नई सुपरकिंग्जकडे आगामी सिझनसाठी अंदाजे १९ कोटींची रक्कम शिल्लक असून त्यांनी यंदा हरभजन सिंह, केदार जाधव या प्लेअर्सना रिलीज केलं आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं नावही यंदाच्या ऑक्शनसाठी शॉर्टलिस्ट झालं असून त्याची बेस प्राईज ही २० लाख एवढी ठेवण्यात आली आहे. ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्ह स्मिथ यांच्याव्यतिरीक्त बांगलादेशचा शाकीब अल हसन, मोईल अली, सॅम बिलींग्ज, लियाम प्लंकेट, जेसन रॉय, मार्क वुड या प्लेअर्सची बेस प्राईजही २ कोटी इतकी निश्चीत करण्यात आली आहे. याव्यतिरीक्त दीड कोटी बेस प्राईजच्या गटात १२ खेळाडूंना जागा मिळाली असून यात हनुमा विहारी आणि उमेश यादव यांना स्थान मिळालंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT