WTC Final : अजिंक्य रहाणेची होणार टीम इंडियात वापसी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajinkya Rahane will return to team india
Ajinkya Rahane will return to team india
social share
google news

Ajinkya Rahane Team India : देशात आयपीएलची (IPL) धुम सुरु आहे, एका पेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहे. या स्पर्धेदरम्यानच मोठी अपडेट समोर आली आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांची टीम इंडियात (Team India) वापसी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. आयपीएल 2023 आणि रणजी ट्रॉफीमधील त्याचा खेळ पाहता, अजिंक्य रहाणेच्या वापसीचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआय या संबंधीत मोठा प्लान आखत असल्याची देखील चर्चा आहे.(ajinkya rahane will return to team india bcci big plan for wtc final)

ADVERTISEMENT

कोलकत्ता विरूद्ध तुफानी खेळी

आयपीएलमध्ये रविवारी चेन्नई विरूद्ध कोलकत्तामध्ये रंगलेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) तुफानी खेळी केली होती.अजिंक्य रहाणेने 29 बॉलमध्ये 71 धावांची आतषबाजी केली होती. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार लगावले होते. अजिंक्यला डेवॉन कॉन्वे आणि शिवम दुबेची साथ मिळाली. या तिघांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर चेन्नईने कोलकत्तासमोर 4 विकेट गमावून 235 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेला कोलकत्ता संघ 6 विकेट गमावून 186 धावापर्यंतच मजल मारू शकला होता.त्यामुळे चेन्नईने 49 धावांनी हा विजय मिळवला होता.

 हे ही वाचा : ‘माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा’, धोनीने दिले निवृत्तीचे संकेत

कोलकत्ताविरूद्धच्या अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) तुफानी खेळीनंतर त्याच्या टीम इंडियात वापसीची चर्चा सुरू आहे. सुत्रांनुसार अशीही माहिती मिळतेय की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये देखील त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआय़ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीसाठी यासाठी मोठा प्लान देखील तयार करत असल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू 4 वर्षानंतर मैदानात

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात येत्या जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (wtc final 2023) फायनल सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात ऑलराऊंडर मिचेल मार्च (mitchell marsh) 4 वर्षानंतर मैदानात वापसी करणार आहे. मार्शला ऑस्ट्रेलियाच्या 17 सदस्यीय संघात सामील करण्यात आले आहे. या संघात अनुभवी फलंदाज डेविड वॉर्नर देखील आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी एक अनुभवी संघ मैदानात उतरवणार आहे.

 हे ही वाचा : ‘आज, मी काहीतरी शिकलो…’,23 वर्षीय खेळाडूचं कौतुक करताना तेंडुलकर असं का म्हणाला?

कधी रंगणार WTC?

वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिपसाठी (wtc final 2023) निवडले गेलेले खेळाडू अॅशेसच्या पहिल्या दोन टेस्ट सामन्यातही दिसणार आहे.वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिप 7 ते 11 जून दरम्यान द ओवल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. तर अॅशेसची सुरुवात 16 जूनपासून होणार आहे.यामध्ये पहिली टेस्ट 16 ते 20 जून दरम्यान एजबेस्टन क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. तर दुसरा टेस्ट सामना 28 जून ते 2 जूलै दरम्यान लॉर्डस मैदानात खेळवला जाणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT