डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये अक्षर पटेलचा विक्रम
टीम इंडियाचा लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेलने घरच्या मैदानावर खेळताना इंग्लंडविरूद्ध डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये धडाकेबाज कामगिरीची नोंद केली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर पहिल्या इनिंगमध्ये ६ विकेट घेतलेल्या अक्षर पटेलने दुसऱ्या इनिंगमध्येही ५ विकेट घेत भारताची बाजू आणखी मजबूत केली. यानिमीत्ताने अक्षर पटेल डे-नाईट टेस्ट मॅचच्या कारकिर्दीत दोन्ही इनिंगमध्ये ५ विकेट घेणारा पहिला बॉलर […]
ADVERTISEMENT
टीम इंडियाचा लेफ्ट आर्म स्पिनर अक्षर पटेलने घरच्या मैदानावर खेळताना इंग्लंडविरूद्ध डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये धडाकेबाज कामगिरीची नोंद केली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर पहिल्या इनिंगमध्ये ६ विकेट घेतलेल्या अक्षर पटेलने दुसऱ्या इनिंगमध्येही ५ विकेट घेत भारताची बाजू आणखी मजबूत केली. यानिमीत्ताने अक्षर पटेल डे-नाईट टेस्ट मॅचच्या कारकिर्दीत दोन्ही इनिंगमध्ये ५ विकेट घेणारा पहिला बॉलर ठरला आहे.
ADVERTISEMENT
दुसऱ्या दिवसाच्या इनिंगमध्ये अहमदाबादच्या पिचने स्पिनर्सना चांगली मदत केली. अहमदाबादच्या पिचवर रफ स्पॉटमध्ये पडल्यानंतर बॉल समोरच्या बॅट्समनला चांगलाच संभ्रमात पाडत होता. टीम इंडियालाही याचा फटका बसला. दुसऱ्या दिवशी जो रुट आणि जॅक लिच यांच्या माऱ्यासमोर ३ बाद ९९ वरुन भारताची अवस्था ऑलआऊट १४५ अशी झाली.
इंग्लंड्या संघाने केलेलं दमदार कमबॅक पाहता भारतीय संघाला दुसऱ्या इनिंगमध्ये कडवी झुंज मिळेल अशी आशा होती. परंतू अक्षर पटेलने पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात इंग्लंडच्या बॅट्समनना अडकवत भारताची बाजू आणखीन वरचढ केली. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा निम्मा संघ गारद करत अक्षरने भारताला विजयासाठी ४९ रन्सचं सोपं टार्गेट मिळेल याची काळजी घेतली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT