Sourav Ganguly Corona Positive: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sourav Ganguly Corona Positive: कोलकाता: बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. 49 वर्षीय सौरव गांगुलीला कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टर त्याच्यावर सतत नजर ठेवून आहेत.

ADVERTISEMENT

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या संकटादरम्यान ही बातमी चिंता वाढवणारी आहे. त्यामुळेच सौरव गांगुलीचा कोरोना सॅम्पल आता जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला आहे. जेणेकरून त्याला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेली आहे की नाही हे तपासलं जाणार आहे.

याआधीही वर्षाच्या सुरुवातीला सौरव गांगुलीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

हे वाचलं का?

जानेवारी 2021 मध्ये सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला काही दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर सौरव गांगुलीला महिन्यातून दोनदा अँजिओप्लास्टी (angioplasty) करावी लागली होती. मात्र, त्यानंतर तो बरा झाला होता आणि सतत काम करत होता. सौरव गांगुली कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आहे.

कर्णधारपदाच्या वादामुळे सौरव होता चर्चेत

ADVERTISEMENT

अलीकडेच टीम इंडियामध्ये कर्णधारपदावरून वाद सुरू असताना सौरव गांगुली सातत्याने चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही काळापूर्वी जेव्हा विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले तेव्हा सौरव गांगुलीने असं म्हटलं होतं की, त्याने विराटला टी-20चे कर्णधारपद न सोडण्यास सांगितले होते. पण त्याने ते ऐकलं नव्हतं.

ADVERTISEMENT

यानंतर निवडकर्त्यांनी व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्याला कोणीही कर्णधारपद सोडू नये असं सांगितलं नसल्याचं म्हणत एक प्रकारे सौरव गांगुलीवरच निशाणा साधला होता.

सतत मास्क घालून वावरणं अशक्य! Corona positive पंतची सौरव गांगुलीकडून पाठराखण

विशेष म्हणजे, सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. ज्याने फिक्सिंग संकटानंतर टीम इंडियाची कमान हाती घेतली होती आणि आपल्या नेतृत्वाखाली अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. सौरवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2003 वर्ल्ड कप फायनलपर्यंत पोहोचली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT