Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, ICC काय घेणार निर्णय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

champions trophy 2025 team india will not go to pakistan to play these champions trophy bcci ask hybrid model icc
ारताचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पीसीबीेने 15 सामन्याचे वेळापत्रक आयसीसीला पाठवले.

point

भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत.

point

पीसीबीच्या या वेळापत्रकाला आयसीसी मंजुरी देणार का?

Champions Trophy 2025, Team India : आयसीसी चॅम्पियन्स ट्राफी 2025 चे यजमान पद पाकिस्तानकडे असणार आहे. पुढच्या वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्चला ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेचे ड्राफ्ट शेड्यूल इंटरनेशनल क्रिकेट काऊन्सिलला (ICC) पाठवले आहे. पण या स्पर्धेसाठी भारत पाकिस्तानला जाणार नाही आहे. त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स 
 ट्रॉफी खेळणार की नाही? यावर आयसीसी काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (champions trophy 2025 team india will not go to pakistan to play these champions trophy bcci ask hybrid model icc) 

ADVERTISEMENT

 PCB ने आयसीसीला पाठवला ड्राफ्ट शेड्यूल 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा पुढच्या वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान खेळवली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या स्पर्धेतील 15 सामन्यांचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) पाठवले आहे. यामध्ये भारताचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवले जाणार आहेत. 

हे ही वाचा : Pooja Khedkar: पूजा खेडकरांना मोदी सरकारकडून मोठा धक्का, IAS ची नोकरीच धोक्यात?

खरं तर आतापर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत दौऱ्याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार, टीम इंडिया या स्पर्धेसाठी  पाकिस्तानला जाणार नाही. त्यामुळे आता ही स्पर्धा नेमकी कशी खेळवली जाणार आहे? हा मोठा प्रश्न आहे. आयसीसी यावर आशिया कपसारखी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल अंतर्गत करण्याची शक्यता आहे. याचा अर्थ भारताचे सामने पाकिस्तानऐवजी अन्य कोणत्या तरी देशात होऊ शकतात. आशिया चषकाप्रमाणे भारतीय संघ युएई किंवा श्रीलंकेत आपले सामने खेळू शकतो,अशी शक्यता आहे. 

हे वाचलं का?

भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये 

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानसह आठ संघ सहभागी होणार आहेत. या आठ संघांमध्ये एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत. कराची, रावळपिंडी आणि लाहोर या तीन ठिकाणी आठ संघांची ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पीसीबीने आयसीसीला सादर केलेल्या वेळापत्रकात सुरक्षेच्या कारणास्तव भारताचे सामने लाहोरमध्येच ठेवण्यात आले आहेत.

हे ही वाचा : Manoj Jarange: 'त्या उमेदवारांना पाडायचं..', बीडमधून जरांगेंची मोठी घोषणा!

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकातील पहिल्या आठ संघांचा समावेश असेल. आठ संघ चारच्या दोन गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेशसह यजमान पाकिस्तान अ गटात आहे. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

'या' दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार

ड्राफ्ट वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 मार्च 2024 रोजी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला 20 फेब्रुवारीला लाहोरमध्ये बांगलादेशविरुद्ध मोहिमेची सुरुवात करायची आहे. यानंतर टीम इंडिया 23 फेब्रुवारीला न्यूझीलंडशी भिडणार आहे. राउंड रॉबिन स्टेज 2 मार्च रोजी संपेल. दोन उपांत्य फेरीचे सामने 5 आणि 6 मार्च रोजी कराची आणि रावळपिंडी येथे होणार आहेत. फायनल 9 मार्चला लाहोरमध्ये होणार आहे.

ADVERTISEMENT

'या' कारणामुळे पाकिस्तानला विरोध 

टीम इंडियाने शेवटचा पाकिस्तान दौरा 2008 मध्ये केला होता. त्यावेळी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आयोजित आशिया कप खेळण्यासाठी गेला होता. त्यानंतर मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. 2012-13 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यानंतर जानेवारी 2013 ते जून 2024 या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ 8 T20 सामने आणि 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. 2023 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता.

दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत पीसीबीने एकतर्फी घेतलेला निर्णय त्यांना महागात पडू शकतो. कारण पीसीबीने आयसीसी, भारत आणि इतर सदस्य देशांशी काहीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे आता पीसीबीसा आयसीसी ग्रीन सिग्नल देते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT