Manoj Jarange: 'त्या उमेदवारांना पाडायचं..', बीडमधून जरांगेंची मोठी घोषणा!
Manoj jarange Rally News : बीड जिल्ह्यातला मराठ्यांवर अन्याय करणारा एकही उमेदवार येऊ द्यायचा नाही, माझ्या मराठ्याला त्रास देतात. आरक्षण देत नाहीत. मग आपल्या विचाराचा एखादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो. पण मराठ्यांना त्रास देणारा नको, असे जरांगे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विधानसभेला सगळेच्या सगळे पाडून टाकायचे.
महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहेत.
गिरीश महाजन माणसाला फसवतो.
Manoj jarange on Vidhan Sabha Election : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज बीडमध्ये दाखल झाली होती. या रॅलीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांवर जोरदार हल्ला केला. त्याचसोबत महायुती सरकार आणि महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले होते. (manoj jarange big statement on vidhan sabha election girish mahajan chhagan bhujbal dhananjay munde maha vikas aghadi mahayuti)
ADVERTISEMENT
जरांगे यावेळी रॅलीत बोलताना म्हणाले की, आता आपणच दोन-तीन महिने धरायचे. आणि विधानसभेला सगळेच्या सगळे पाडून टाकायचे. एकालाही येऊ द्यायचं नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला. बीड जिल्ह्यातला मराठ्यांवर अन्याय करणारा एकही उमेदवार येऊ द्यायचा नाही, माझ्या मराठ्याला त्रास देतात. आरक्षण देत नाहीत. मग आपल्या विचाराचा एखादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो. पण मराठ्यांना त्रास देणारा नको, असे जरांगे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: ठरलं.. 1500 रुपये 'या' दिवशी जमा होणार तुमच्या बँकेत!
''सरकारची राजकीय इच्छाशक्ती आहे. महाविकास आघाडीवाले नाही आले म्हणून मग तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्याचये नाही का? तुम्हाला द्यायचे नाही का? मला तर वाटतं हे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहेत. तुमचा बाप झाला की आजा आणि तुमचा नातू निवडून द्यायचा. महायुती की महाविकास आघाडी त्यांना सर्वसामान्यांचा विचार करायचा नाही का?'' असा हल्ला जरांगेंनी महाविकास आणि महायुतीवर चढवला होता,.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, ''शिंदे, फडणवीसांना मी सांगतो, तुम्हाला किती बळी घ्यायचेत आमच्या मराठ्यांचे आणखीण, साडेतीनशे चारशे पेक्षा जास्त बळी गेलेत. मराठा समाजाच्या वेदना समजून घ्या, आत्महत्या केलेल्या आमच्या मराठा युवकाच्या घरात जाऊन बघा, त्यांच्या घरात केवळ काळोख आणि काळोख दिसेल. बापाने आणि पोराने देखील आरक्षणासाठी आत्महत्या केली. कपाळाचे कुंकू पुसलेल्या आमच्या महिलेला विचार की, घरातील परिस्थिती किती वाईट आहे. त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडा''.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Vidhan Sabha election : शरद पवारांची विधानसभा निकालाबद्दल मोठी भविष्यवाणी! मविआ जिंकणार 'इतक्या' जागा
जरांगेंनी यावेळी गिरीश महाजन यांना देखील सुनावले.गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या आंदोलनात जातो ते आंदोलन बंद पाडतो. नाहीतर जात किंवा आंदोलनच फोडतो,असा गंभीर आरोप जरांगेंनी यावेळी केला. वाटलं तो एकटाच हुशार आहे मी त्याच्या पुढचा आहे, असे देखील जरांगे यांनी म्हटले आहे. तसेच छगन भुजबळांच्या 10 पिढ्या जरी आल्या ना, तरीही मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेऊच राहणार असा इशारा देखील जरांगेंनी यावेळेला दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT