Vidhan Sabha election : शरद पवारांची विधानसभा निकालाबद्दल मोठी भविष्यवाणी! मविआ जिंकणार 'इतक्या' जागा

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar tell exact number of winning  vidhan sabha election maha vikas aghadi maharashtra politics
शरद पवारांनी विधानसभेत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार याचा आकडा सांगितला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र सध्या चुकीच्या लोकांच्या हातात आहे.

point

राज्य बदलांचा निर्णय लोकांनी घेतला.

point

48 पैकी 31 लोकांनी आपल्या विचारांना साथ दिली

Sharad Pawar On Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षानी तयारी करायला सुरूवात केली आहे. मतदार संघाच्या चाचपण्या सुरु आहेत, बैठकांचा धडाकाही लावला जातोय. या सर्वात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) नेमक्या किती जागा जिंकणार? याचा थेट पवारांनी आकडाच सांगितला आहे. त्यामुळे पवारांनी नेमक्या किती जागांचा अंदाज वर्तवला आहे. हे जाणून घेऊयात. (sharad pawar tell exact number of winning  vidhan sabha election maha vikas aghadi maharashtra politics) 

वाय. बी. चव्हाण सेंटमधील कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. या कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. या कार्यक्रमातून बोलताना शरद पवारांनी विधानसभेत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार याचा आकडा सांगितला आहे. विधानसभेच्या 288 जागा आहे. या 288 जागांपैकी सव्वा दोनशे (225) पेक्षाहून अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा अंदाज शरद पवारांनी व्यक्त केला आहे. 

हे ही वाचा : Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा आणखी पाय खोलात, मॉक इंटरव्ह्यू अडचणी वाढणार? Video Viral

 शरद पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्र सध्या चुकीच्या लोकांच्या हातात आहे. पण लोकसभा निवडणुकीत जनतेने हे चित्र बदलण्याचा दृष्टीने काही निकाल दिले आहेत. महाराष्ट्रात 48 खासदार आहेत. पाच वर्षापुर्वी जी निवडणूक झाली त्यात विरोधकांचे 6 लोकप्रतिनिधी जिंकले होते.त्यातले 4 राष्ट्रवादीचे होते. हे चित्र असताना मोदींच्या कार्यकाळात जी आंदोलने झाली. हे पाहता राज्य बदललं पाहिजे या निष्कर्षावर लोकं आली आहेत. आणि तो राज्य बदलाचा निकाल लोकांनी घेतला 48 पैकी 31 लोकांनी आपल्या विचारांना साथ दिली. यामधील राष्ट्रवादीचे 10 पैकी 8 खासदार निवडून आले आहेत. ही खरी सुरूवात झाल्याचे शरद पवारांनी सांगितले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 आता  विधानसभेच्या 288 जागेवर मला चित्र असं दिसतंय की सव्वा दोनशे (225) पेक्षा जास्त जागा या विरोधकांच्या येतील. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात आपलं राज्य आणूया, आणि सत्तेच्या मार्फत लोकांच्या जीवनात बदल कसा होईल? याची काळजी आपण घेऊयात, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : Mumbai Weather Update: मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; असा आहे हवामान विभागाचा अंदाज

फडणवीसांनी सांगितला 'हा' आकडा 

गेल्या शनिवारी महायुतीची षण्मुखानंदमध्ये शासकीय योजना, अंमलबजावणी संदर्भात बैठक पार पडली आहे. या बैठकीतून देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकू, असा विश्वासही व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सरकारी योजनांची माहिती देत कार्यकर्त्यांच्या कानपिचक्याही घेतल्या आहेत. 

ADVERTISEMENT

सकाळी 9 वाजता येऊन ते काय वेड वाकडं बोलून जातील दिवसभर त्या वेड्या वाकड्यावर माध्यम चालतील. या ट्र्रॅपमध्ये फसण्याची गरज नाही. आपण जे काम केलं आहे त रोज बोललं पाहिजे. वारंवार बोललं पाहिजे. पब्लिक मेमरी शॉर्ट असते, ते काल बोलले आज विसरतात, जे चांगलं केलंय ते रोज सांगा, असा सल्ला देखील फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT