Pooja Khedkar: पूजा खेडकरांना मोदी सरकारकडून मोठा धक्का, IAS ची नोकरीच धोक्यात?
Pooja Khedkar Case Update : भारत सरकारच्या अतिरिक्त सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आता पुजा खेडकर यांच्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या समितीला 2 आठवड्यात या चौकशीचा अहवाल सादर करायचा आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
IAS पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार
केंद्राने नेमली एक सदस्यीय चौकशी समिती
समितीला 2 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश
Pooja Khedkar Case Update : महाराष्ट्रात कॅडर 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. पूजा खेडकर (Pooja Khedkar )यांच्या चमकोगिरीची पुण्यापासून दिल्लीपर्यंत चर्चा रंगली होती. त्यामुळे या प्रकरणाचा अहवाल पीएमओने (PMO) देखील मागवला होता. त्यानंतर आता मोदी सरकार अॅक्शन मोडमध्ये आली असून, पूजा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती आता पूजा खेडकर यांची निवड कशी झाली? आणि इतर आक्षेपांची चौकशी करणार आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांची नोकरी धोक्यात येण्याची शक्यता आहे. (pooja khedkar ias officer in trouble centre forms 1 member panel pune police send notice over red beacon on car unpaid fines)
ADVERTISEMENT
द हिंदूने दिलेल्या एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्या उमेदवारीचे दावे आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक चौकशी समिती नेमली आहे. भारत सरकारच्या अतिरिक्त सचिव दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आता पुजा खेडकर यांच्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या समितीला 2 आठवड्यात या चौकशीचा अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे या चौकशीत आता काय सत्य समोर येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा : Vidhan Parishad Election: कोणासोबत होणार दगाफटका? आमदारांची मतं कोणाला बनवणारं आमदार?
प्रकरण काय?
महाराष्ट्र केडरच्या 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या अतिरिक्त मागण्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत.आयएएस असताना स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून चमकोगिरी केल्याप्रकरणी पूजा खेडकर या चर्चेत आल्या होत्या. अशा प्रकारचा दिवा कोणत्याही अधिकाऱ्याच्या गाडीवर लावण्यात येऊ नये अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या असतानाही पूजा खेडकरांनी ती गोष्ट केली. तसेच होम डिस्ट्रिक्टमध्ये ट्रेनी कार्यकाळ सुरू असताना त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे केबीन बळकावल्याची घटना घडली. अधिकारात नसताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्याची केबिन बळकावल्याची घटना घडली. अधिकारात नसताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून एक गाडी, शिपायी आणि कार्यालयाची मागणी केली होती.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana Money: 'ही' चूक केली की 1500 रुपये विसरा.. थोडं सांभाळून!
तसेच नवीन अहवालानुसार, पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि मेंटल इलनेस असल्याची सर्टिफिकेट सादर करून UPSC ची परीक्षा दिली होती. त्याआधारे विशेष सवलत मिळवून त्या आयएएस झाल्या. त्यांना जर ही सवलत मिळाली नसती तर जितके गुण त्यांना मिळाले आहेत त्यात त्यांना IAS पद मिळणे अशक्य होते.
दरम्यान निवड झाल्यानंतर पूजा खेडकर यांची वैद्यकीय तपासणी होणार होती. एम्सने त्यांना सहावेळा चाचणीसाठी बोलावले होते. मात्र सहाही वेळा त्या चाचणीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. याउलट त्यांनी बाहेरच्या वैद्यकीय एजन्सीकडून एमआरआय अहवाल सादर करणे निवडले, जे UPSC ने स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ब ट्रिब्युनल म्हणजे कॅट मध्ये पूजा खेडकर यांच्या नियुक्तीला आव्हान दिले होते. 23 फेब्रुवारी 2023 रोजी कॅटने पूजा खेडकर यांच्याविरोधात निकाल दिला होता. मात्र त्यानंतरही पूजा खेडकर यांनी सादर केलेले वादग्रस्त प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले आणि त्यांची निवड वैध ठरवण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT