Vidhan Parishad Election: कोणासोबत होणार दगाफटका? आमदारांची मतं कोणाला बनवणारं आमदार?
Vidhan Parishad Election 2024 Politics: विधानपरिषद निवडणूक ही 12 जुलै रोजी होणार आहे. 12 पैकी 11 उमेदवार निवडून येणार आहेत. मात्र कोणत्या एका उमेदवाराला आणि पक्षाला या निवडणुकीत फटका बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
विधानपरिषद निवडणुकीसाठी 12 जुलै रोजी मतदान
महाविकास आघाडी तिसऱ्या उमेदवार कसा आणणार निवडून?
महायुतीला निवडणुकीत फटका बसणार?
Vidhan Parishad Election 2024 Maharashtra Politics: मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी उद्या (12 जुलै) निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी ठाकरे, शिंदे, अजित पवार आणि भाजपनं खबरदारी म्हणून त्यांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलं आहे. दुसरीकडे महायुती आणि मविआ दोन्ही बाजूंनी आमचेच उमेदवार जिंकणार असे दावे करत आहेत. महायुती 9 उमेदवार निवडून आणणार की महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून आणून महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप घडवणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. (vidhan parishad election 2024 maha vikas aghadi and mahayuti with whom will foul play exactly know exact math of this election bjp shiv sena shiv sena ubt ncp ncp sharad pawar congress)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस 2022 च्या विधानपरिषद निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी नक्कीच एक रणनिती आखेल. त्यामुळे या निवडणुकीत नेमका कोणाला फटका बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या निवडणुकीतील मतांचं गणित, कोटा, प्राधान्यक्रम कसा ठरवला जातो? मतमोजणी कशी होते? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
हे ही वाचा>> Vidhan Parishad Election : मविआ विरुद्ध महायुती... कुणाचा उमेदवार पडणार?
विधानपरिषद निवडणूक कशी होते?
विधानसभा निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेत थेट निवडणूक प्रकिया नाही. राष्ट्रपती निवडणूक, सिनेट यासारख्या निवडणुकीसाठी पसंतीक्रमाची पद्धत इथं वापरली जाते. निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो.
हे वाचलं का?
संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतं. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकांची मतं मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मतं जो पूर्ण करील तो उमेदवार विजयी होतो.
निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार हा विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही.
ADVERTISEMENT
विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी खुलं मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Devendra Fadnavis : ''युतीमध्ये तडजोड करावी लागते'', फडणवीस असं का म्हणाले?
विधानपरिषद निवडणुकीसाठी मविआ आणि महायुतीचं नेमकं गणित कसं?
भाजप
प्रत्येक पक्षाचा प्राधान्यक्रम हा ठरलेला असतो. कोणाला आधी निवडून आणायचंय. त्यामुळे कोट्या पेक्षा दोन मतं जास्त दिली जातात. आता 23 चा कोटा आहे. अशावेळी भाजप आपल्या पहिल्या 4 उमेदवारांना 23-23 मतं देऊन आणि उरलेली जी सरप्लस मतं आहे किंवा इकडून-तिकडून मिळवायची जी मतं आहेत ती शेवटचा जो उमेदवार आहे त्याला द्यायची अशीही एक रणनिती भाजपची असू शकते.
शिवसेना (शिंदे गट)
सध्याच्या घडीला शिवसेना शिंदे गटाकडे 45 मतं आहेत. याशिवाय त्यांच्याकडे अपक्ष आमदार असल्याचाही दावा आहेत. यामुळे त्यांचे दोन्ही आमदार निवडून येऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडे सरप्लस मतं नाहीत. कोटा लक्षात घेतल्यास त्यांचे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना 4 मतं कमीच पडत आहेत. ते एका उमेदवाराला क्लिअर कट मतं देऊन निवडून आणू शकतात. दुसरा जो उमेदवार आहे त्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बराच प्रयत्न करावा लागणार आहे.
मविआचं विधान परिषदेचं गणित
मागील विधान परिषद निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता काँग्रेस प्रज्ञा सातव यांना अतिरिक्त मतं देऊ शकतात. जर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना 30 मतं दिली तरी त्यांच्याकडे 7 मतं ही सरप्लस आहेत. हीच मंत ते शिवसेना UBT चे मिलिंद नार्वेकर किंवा शेकापचे जयंत पाटील यांना देऊ शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेले जयंत पाटील हे पहिल्या फेरीत निवडून येण्याची शक्यता ही कमीच आहे. मतांचं गणित लक्षात घेतल्यास जयंत पाटील हे 23 च्या कोट्यापासून काहीसे दूर राहत आहेत. मात्र, आतापर्यंत अनेकदा जयंत पाटील हे विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे मतांची जुळवाजुळव कशी करायची हे जयंत पाटलांनाही चांगलंच ठावूक आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी जयंत पाटील हे बाजी पलटवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेना (UBT) पक्ष मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल. मिलिंद नार्वेकर यांचे अनेक आमदारांशी चांगले संबंधही आहेत. ज्याचा फायदा हा त्यांना होऊ शकतो. मात्र, सध्याचं बलाबल लक्षात घेतलं तर काँग्रेसची सरप्लस मतं आणि इतर काही मतांची जुळवाजुळव केल्यास मिलिंद नार्वेकर हे निवडून येऊ शकतात.
ही सगळी गणितं लक्षात घेतली तरी ऐनवेळी नेमकं काय घडणार हे उद्याच्या मतदानानंतरच आपल्याला समजू शकेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT