IPL Auction 2023 : ‘रात्रभर झोपू शकलो नाही’; मालामाल झालेल्या खेळाडूंची भावना
IPL 2023 चा मिनी लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोची येथे झाला. हॉटेल ग्रँड हयात येथे झालेल्या या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन जलवा पाहायला मिळाला. सॅम करनला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. यासह सॅम करन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. ग्रीन स्टोक्सवर पैशांचा पाऊस तसेच ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीननेही लिलावात भरपूर […]
ADVERTISEMENT
IPL 2023 चा मिनी लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोची येथे झाला. हॉटेल ग्रँड हयात येथे झालेल्या या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन जलवा पाहायला मिळाला. सॅम करनला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. यासह सॅम करन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
ADVERTISEMENT
ग्रीन स्टोक्सवर पैशांचा पाऊस
तसेच ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीननेही लिलावात भरपूर पैसे कमावले. पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने त्याला 17.50 कोटी रुपयांना करारबद्ध केले. ग्रीन हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. बेन स्टोक्स, निकोलस पूरन आणि हॅरी ब्रूक हे खेळाडूही महागड्या किमतीत विकले गेले.
आयपीएल लिलावाचे जगाच्या कानाकोपऱ्यात थेट प्रक्षेपण होत होते. अशा स्थितीत लिलावात दाखल झालेल्या खेळाडूंचीही संपूर्ण कारवाईवर करडी नजर होती. लिलावात विकले गेलेले खेळाडू आपला आनंद शेअर करण्यासाठी ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेले. पंजाब किंग्जच्या ट्विटला उत्तर देताना सॅम करनने लिहिले की, ‘जेथून हे सर्व सुरू झाले तेथे मी परत आलो आहे. याची वाट पाहत होतो.
हे वाचलं का?
Back to where it all started! Looking forward to it ? https://t.co/1lpsK8fX4V
— Sam Curran (@CurranSM) December 23, 2022
लिलावात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महाग विकला गेलेला कॅमेरॉन ग्रीन याने मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडीओ संदेशात सांगितले की, संघात सामील होण्यासाठी तो खूप उत्साहित आहे. त्याच वेळी, बेन स्टोक्सने चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाल्यानंतर त्याचा उत्साह शेअर करण्यासाठी पिवळा बॅकराऊंड असलेला फोटो शेअर केला आहे.
Paltan, तुमच्यासाठी our very own Green ?️?#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #TATAIPLAuction MI TV pic.twitter.com/snhN6JZWuc
— Mumbai Indians (@mipaltan) December 23, 2022
— Ben Stokes (@benstokes38) December 23, 2022
लखनौ संघात सामील झालेला अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राही आनंदी झाला. अमित मिश्राने लिहिले, ‘मला आयपीएलमध्ये संधी दिल्याबद्दल लखनौ सुपर जायंट्सचे आभार. स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहे. मी नेहमीप्रमाणेच सर्वोत्तम प्रयत्न करेन. कृपया मला पाठिंबा देणे सुरू ठेवा, असं त्यानं लिहिलं आहे.
ADVERTISEMENT
Thank you @LucknowIPL for the opportunity. Looking forward to the tournament. I will do my best as always. Please continue to support me. #ipl2023 #ipl #lucknowsupergiants
— Amit Mishra (@MishiAmit) December 23, 2022
सॅम करन यांनी अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सशीही विशेष संवाद साधला. सॅम म्हणाला, ‘काल रात्री मला नीट झोपही लागली नाही. लिलावाबद्दल उत्साही असण्यासोबतच मी थोडा घाबरलो होतो. मला इतकी जास्त किंमत मिळेल अशी अपेक्षा नव्हती तरी. पंजाब किंग्जकडून खेळताना मी चार वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते, त्यामुळे पुन्हा तिथे जाणे खूप छान होईल.
ADVERTISEMENT
आयपीएल 2023 लिलावातील सर्वात महागडे खेळाडू:
सॅम कुरन (पंजाब किंग्स) – रु. 18.50 कोटी
कॅमेरॉन ग्रीन (मुंबई इंडियन्स) – रु. 17.50 कोटी
बेन स्टोक्स (चेन्नई सुपर किंग्स) – रु. 16.25 कोटी
निकोलस पूरन (लखनौ सुपरजायंट्स) – रु. 16 कोटी
ब्रोके (सनराईजर्स हैदराबाद) – 13.25 कोटी रुपये
मयंक अग्रवाल (सनरायझर्स हैदराबाद) – 8.25 कोटी रुपये
शिवम मावी (गुजरात टायटन्स) – 6 कोटी रुपये
जेसन होल्डर (राजस्थान रॉयल्स) – 5.75 कोटी रुपये
मुकेश कुमार (दिल्ली कॅपिटल्स) – 5.50 कोटी रुपये
रिच हेन (सनराईजर्स हैदराबाद) – रु. 5.25 कोटी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT