क्रिकेटपटू युवराज सिंगविरोधात गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगविरोधात हरियाणा पोलिसांनी गुन्हा दाखल गेला आहे. २०२० मध्ये इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान दलित समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप युवराजवर ठेवण्यात आला आहे. हरियाणामधील हिसार येथील हन्सी पोलीस ठाण्यात युवराजविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आयपीसीच्या १५३, १५३ ए, २९५, ५०५ अंतर्गत हिसार येथील एका वकिलाने युवराजविरोधात तक्रार दाखल केली आहे. २०२० मध्ये कोरोना लॉकडाउन काळात युवराज सिंह भारताचा ओपनर रोहित शर्मासोबत इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये गप्पा मारत होता. या गप्पांदरम्यान युवराजने बोलत असताना दलित समाजाबद्दल एक वक्तव्य केलं होतं. सोशल मीडियावर युवराजची ही व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली होती.

ट्विटरवरुन माफी मागताना युवराजने आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचं सांगितलं होतं. पण एक जबाबदार भारतीय नागरिक या नात्याने जर माझ्या वक्तव्याने कोणाच्याही भावना दुखावला असतील तर मी माफी मागतो असं युवराजने म्हटलं होतं. त्यामुळे याप्रकरणी आता पुढे काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT