न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू Chris Cairns ची मृत्यूशी झुंज, प्रकृती अत्यंत गंभीर
कॅनबेरा: न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू ख्रिस केर्न्स हा अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्याला काल ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामधील एका रुग्णालयात दाखाल करण्यात होतं. मात्र, अचानक त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली त्यामुळे सध्या त्याला लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं आहे. न्यूझीलंड हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, केर्न्सला गेल्या आठवड्यात कॅनबेरामध्ये गंभीर वैद्यकीय आणीबाणीचा सामना करावा लागला. ओरटिक डिसेक्सन याच गंभीर आजाराशी […]
ADVERTISEMENT

कॅनबेरा: न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू ख्रिस केर्न्स हा अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्याला काल ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामधील एका रुग्णालयात दाखाल करण्यात होतं. मात्र, अचानक त्याची प्रकृती अधिकच खालावत गेली त्यामुळे सध्या त्याला लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आलं आहे.
न्यूझीलंड हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, केर्न्सला गेल्या आठवड्यात कॅनबेरामध्ये गंभीर वैद्यकीय आणीबाणीचा सामना करावा लागला. ओरटिक डिसेक्सन याच गंभीर आजाराशी तो सध्या झुंज देत आहे. या आजारात शरीराच्या मुख्य धमनीचा आतील थर हा खराब होत जातो.
वृत्तानुसार, ‘सध्या तो ज्या रुग्णालयात दाखल आहे तिथे त्याच्यावर अनेक ऑपरेशन करण्यात आले आहेत. परंतु त्याचे शरीर अपेक्षेप्रमाणे उपचारांना प्रतिसाद देत नाही.’
आपल्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलूंपैकी एक असलेल्या केर्न्सने 1989 ते 2006 दरम्यान न्यूझीलंडसाठी 62 कसोटी, 215 वडे आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. त्याचे वडील लान्स केर्न्स यांनीही न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केलं होतं.