नाडीयादचा जयसूर्या कसा बनला टीम इंडियाचा हिरो??
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर टीम इंडियाने डे-नाईट टेस्टमध्ये इंग्लंडला पहिल्याच दिवशी बॅकफूटवर ढकललं. होम ग्राऊंडवर खेळत असलेल्या अक्षर पटेलने पहिल्या इनिंगमध्ये ६ विकेट घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. इंग्लंडची पहिली इनिंग अवघ्या ११२ रन्सवर संपवली. गुजरातच्या नाडीयाद भागात एका छोट्याश्या वस्तीत राहणारा अक्षर पटेल टीम इंडियाचा हिरो कसा बनला याची स्टोरीही तितकीच रंजक आहे. अवश्य […]
ADVERTISEMENT
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर टीम इंडियाने डे-नाईट टेस्टमध्ये इंग्लंडला पहिल्याच दिवशी बॅकफूटवर ढकललं. होम ग्राऊंडवर खेळत असलेल्या अक्षर पटेलने पहिल्या इनिंगमध्ये ६ विकेट घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं. इंग्लंडची पहिली इनिंग अवघ्या ११२ रन्सवर संपवली. गुजरातच्या नाडीयाद भागात एका छोट्याश्या वस्तीत राहणारा अक्षर पटेल टीम इंडियाचा हिरो कसा बनला याची स्टोरीही तितकीच रंजक आहे.
ADVERTISEMENT
अवश्य वाचा – योगायोग! 100 वी टेस्ट खेळणाऱ्या इशांतची कपिल देव यांच्याशी बरोबरी
लहानपणापासून अक्षर पटेलला क्रिकेटची आवड होती. लेफ्ट आर्म बॉलिंग आणि बॅटींग अशा ऑलराऊंड खेळामुळे त्याला नाडीयादचा जयसूर्या असं टोपण नाव पडलं. क्रिकेटमध्ये आपण करिअर करु शकतो हे आपल्या वडिलांना समजवून सांगायला अक्षरला बरेच कष्ट घ्यावे लागले. आपला मुलगा फिट रहावा आणि इतर मुलांसोबत त्याने वेळ वाया घालवू नये यासाठी अक्षरच्या वडीलांनी सुरुवातीला त्याला क्रिकेटच्या प्रॅक्टीसला जाण्याची परवानगी दिली.
हे वाचलं का?
काही वर्षांपूर्वी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अक्षर पटेलच्या वडिलांनी एक सुंदर आठवण सांगितली होती. ज्यावेळी राजेश पटेल अक्षरच्या कोचला भेटले त्यावेळी त्यांनी कोचना अक्षरच्या खेळाची फारशी चिंता करु नका. फक्त त्याला एवढं पळवा की संध्याकाळी घरी आल्यावर तो झोपला पाहिजे. पण अक्षरने या संधीचं सोनं केलं आणि क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. सहा महिन्यांनंतर अक्षरने आपल्या शाळेच्या टीमचं नेतृत्व केलं. कालांतराने अक्षरची U-16 साठीच्या संघात निवड झाली ज्यात त्याने ९८ रन्स आणि ३ विकेट घेतल्या.
अवश्य वाचा – होम ग्राऊंडवर चमकला अक्षर पटेल, इंग्लंडच्या डाव गुंडाळला
ADVERTISEMENT
नाडीयादचा हा जयसूर्या अहमदाबादच्या ग्राऊंडवर टीम इंडियासाठी हिरो ठरला. अहमदाबादच्या पिचवर अक्षरने ६ विकेट्स घेत इंग्लंडच्या महत्वाच्या विकेट्स घेतल्या. टेस्ट करिअरमध्ये पाच विकेट घेण्याची अक्षरची ही दुसरी वेळ ठरली. त्यामुळे भविष्यातही नाडीयादचा हा जयसूर्या टीम इंडियाच्या मदतीसाठी धावून येईल अशी सर्व फॅन्सना आशा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT