Team India For Ireland Tour: हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार, पंतला विश्रांती; ‘या’ दौऱ्यासाठी संघ जाहीर
मुंबई: बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी (India Vs Ireland) टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या मालिकेत ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे, तर सूर्यकुमार यादवचे पुनरागमन झाले आहे. टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यापूर्वी आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. हे […]
ADVERTISEMENT
मुंबई: बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी (India Vs Ireland) टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या मालिकेत ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे, तर सूर्यकुमार यादवचे पुनरागमन झाले आहे.
ADVERTISEMENT
टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यापूर्वी आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. हे दोन सामने 26 आणि 28 जून रोजी होणार आहेत. या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर युवा संघाला आघाडीवर आणण्यात आले आहे. हे सामने भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता प्रसारित केले जातील.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया: हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
हे वाचलं का?
बाबा, ही इनिंग खास तुमच्यासाठी!
आयपीएल जिंकल्याने पांड्याची कर्णधारपदी वर्णी
ADVERTISEMENT
T20 विश्वचषक 2021 नंतर मैदानापासून दूर असलेल्या हार्दिक पांड्याने IPL 2022 मध्ये पुनरागमन केले. हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली आणि त्याच्या संघाला आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावून दिलं. हार्दिकला या नेतृत्वगुणाचे आता बक्षीस मिळाले आहे.
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या मालिकेत हार्दिक पांड्याला उपकर्णधार करण्यात आले होते, तर आता आयर्लंड दौऱ्यात त्याच्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे.
या खेळाडूंचा संघात प्रथमच प्रवेश
आयर्लंडसारख्या छोट्या संघाविरुद्ध, टीम इंडियाने एक प्रकारे आपली बी-टीम आणली आहे. परंतु जर तुम्ही नावांवर नजर टाकली तर ज्या आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू खेळतात त्यामध्ये बहुतेक खेळाडू हे मोठे स्टार आहेत. याच कामगिरीच्या जोरावर राहुल त्रिपाठीची टीम इंडियात निवड झाली आहे. संजू सॅमसनचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. आफ्रिका मालिकेत त्याची निवड न झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण आता निवड समितीने त्याला या मालिकेसाठी संधी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT