Hardik Pandya : मुंबई इंडियन्सला मोठा झटका, कर्णधार हार्दिक पांड्या IPL मधून होणार बाहेर

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

hardik pandya likely to miss ip 2024 due to injury mumbai indians captain rohit sharma
hardik pandya likely to miss ip 2024 due to injury mumbai indians captain rohit sharma
social share
google news

Hardik Pandya Miss IPL 2024 : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने नुकतीच रोहित शर्माला (Rohit sharma) कर्णधार पदावरून हटवून हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) हाती संघाची धुरा दिली होती. मुंबई इंडियन्स संघाचा हा निर्णय़ चाहत्यांना अजिबात पटला नव्हता.त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मुंबई संघाला ट्रोल करण्यात आले होते. या सर्व घटना ताज्या असतानाच मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण मुंबईचा नवीन कर्णधार हार्दिक पंड्या आयपीएल 2024 मधून बाहेर होण्याची शक्यता आहे.अशी चर्चा आय़पीएलच्या वर्तुळात रंगली आहे. या चर्चेत किती तथ्य आहे. हे जाणून घेऊयात. (hardik pandya likely to miss ip 2024 due to injury mumbai indians captain rohit sharma)

ADVERTISEMENT

हार्दिक पांड्यासंदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीने मुंबई इंडियन्स संघाचे टेन्शन वाढवले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्या दुखापतीमुळे आयपीएल 2024 मधून बाहेर होण्याची शक्यता आहे. तसेच अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतही तो खेळण्याची शक्यता नाही.दरम्यान बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘हार्दिकच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. आयपीएल संपण्यापूर्वी त्याच्या उपलब्धतेवर मोठे प्रश्नचिन्ह कायम आहे.

हे ही वाचा : Manoj Jarange: मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत, मनोज जरांगेंचं ‘ते’ भाषण जसंच्या तसं..

रोहित स्विकारणार कर्णधार पदाची जबाबदारी

हार्दिक पांड्याची दुखापत मुंबई इंडियन्ससोबत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण सूर्यकुमार यादवला आधीच दुखापत झाली असून तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यात हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेचे नेतृत्व केले. आता या दोन खेळाडूंच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आरक्षणाची ‘ती’ याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली, पण…

दरम्यान वर्ल्ड कप 2023 मध्ये बांगलादेश विरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्याचे लिगामेंट फाटले होते. त्यामुळे हार्दिकला विश्वचषक अर्ध्यावर सोडावा लागला होता. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेलाही त्याला मुकावे लागले होते. एवढेच नाही तर हार्दिक दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा भागही नव्हता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT