ICC T20 World Cup 2022 : विश्व चषकात पैशांचा पाऊस; जिंकणाऱ्या संघाला मिळणार इतकं बक्षीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

T20 विश्वचषक 2022 साठी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या महान स्पर्धेसाठी आयसीसीने शुक्रवारी बक्षीस रक्कम जाहीर केली. ICC T20 विश्वचषक 2022 जिंकणाऱ्या संघाला सुमारे 13 कोटी रुपये मिळतील. आयसीसीने जाहीर केले आहे की विजेत्या संघाला एकूण $1.6 दशलक्ष डॉलर दिले जातील, तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला यातील निम्मी रक्कम मिळेल. T20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होत आहेत. एक प्रकारे प्रत्येक संघाला ICC कडून काहीतरी रक्कम दिली जाईल, ज्याची घोषणा करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

कोणत्या संघाला किती पैसे मिळतील?

T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला $1.6 दशलक्ष तर उपविजेत्या संघाला $8 दशलक्ष मिळतील. तर उपांत्य फेरी गाठणाऱ्या उर्वरित दोन संघांना $4-4 लाख दिले जातील. T20 विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण $ 5.6 दशलक्ष बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे, जी सर्व 16 संघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वितरित केली जाईल.

हे वाचलं का?

स्पर्धेतून बाहेर पडणाऱ्या संघानाही मिळणार रक्कम

सुपर-12 स्टेजवर एकूण 12 संघ खेळतील, त्यापैकी 4 संघ उपांत्य फेरीत जाणार आहेत. या टप्प्यातून बाहेर पडणाऱ्या 8 संघांना आयसीसीकडून बक्षीसही देण्यात येणार आहे. या संघांना 70 हजार डॉलर्स दिले जातील, गेल्या टी-20 विश्वचषकात ही रक्कम 40 हजार डॉलर होती.पहिल्या फेरीतून बाहेर पडणाऱ्या चार संघांना 40 हजार डॉलर्स दिले जातील. तर पहिल्या फेरीत विजयी झाल्यास देखील 40 हजार डॉलर्सची रक्कम मिळेल. या फेरीत एकूण 12 सामने खेळले जातील, ज्या दरम्यान एकूण $4.8 दशलक्ष ICC द्वारे वितरित केले जातील.

ADVERTISEMENT

ICC T20 विश्वचषकाच्या सुपर-12 टप्प्यात 8 संघांचे स्थान निश्चित झाले आहे. ज्यामध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आहेत. उर्वरित 8 संघांना पहिली फेरी खेळावी लागणार आहे. ज्यामध्ये नामिबिया, श्रीलंका, नेदरलँड, UAE, वेस्ट इंडीज, स्कॉटलंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे आहेत. या 8 पैकी चार संघ सुपर-12 साठी पात्र ठरतील.

ADVERTISEMENT

T20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला किती रक्कम मिळणार? (भारतीय रुपया)

• विजेता: सुमारे 13 कोटी रुपये

• उपविजेते: रु. 6.52 कोटी

• उपांत्य फेरी: रु. 3.26 कोटी

• सुपर-12 मध्ये विजय: 32 लाख रुपये

• सुपर-12 मधून संघ वगळला: रु 57 लाख

• पहिल्या फेरीत जिंका: 32 लाख रुपये

• पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यावर: 32 लाख रुपये

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT