WC Final 2023 : वर्ल्ड कप विजेत्या संघावर होणार पैशाचा पाऊस! किती बक्षीस रक्कम मिळणार?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

icc world cup 2023 final prize money ind vs aus final narendra modi stadium compare with 1983 2011 world cup
icc world cup 2023 final prize money ind vs aus final narendra modi stadium compare with 1983 2011 world cup
social share
google news

Ind vs Aus Final,World Cup 2023 Prize Money : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीअमवर भारत आणि आस्ट्रेलियामध्ये फायनल सामना रंगला आहे. या सामन्याचा आता काही तासात विजेता घोषित होणार आहे. या विजेत्या संघाला नेमकी किती बक्षीस रक्कम मिळणार आहे. आणि याआधी 1983 आणि 2011 मध्ये भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कप सामन्यात टीम इंडियाला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली होती, हे जाणून घेऊयात. (icc world cup 2023 final prize money ind vs aus final narendra modi stadium compare with 1983 2011)
world cup

लता मंगेशकरांमुळे मिळाले खेळाडूंना बक्षीस

टीम इंडियाने पहिला वर्ल्ड कप 1983 साली कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वात जिंकला होता. यावेळी भारताच क्रिकेट बोर्ड बीसीसीआयकडे खेळाडूंना बक्षीस द्यायला पैसे नव्हते. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीवर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांना खेळाडूंना बक्षीस द्यायचे होते, मात्र बोर्डाकडे पैसै नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या परिस्थितीत गानकोकिळा लता मंगेशकरची मदत मागितली होती.

हे ही वाचा : Bhujbal Vs Damania : घर लाटल्याच्या दमानियांच्या आरोपांवर भुजबळांचं उत्तर, फर्नांडिस प्रकरण नेमकं काय?

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयानंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअमवर लता मंगेशकर यांचे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. या कॉन्सर्टमधून 20 लाखाची कमाई झाली. आणि त्यानंतर भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूला एक-एक लाख बक्षीस देण्यात आले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

…म्हणून स्टेडियममध्ये सीट राखीव

लता मंगेशकर यांचे हे योगदान बीसीसीआय आणि खेळाडूंनी लक्षात ठेवले. आणि बीसीसीआयने एक प्रस्ताव मांडला, ज्यामध्ये लता मंगेशकर जिथपर्यंत हयात आहेत, तोपर्यंत भारतातील प्रत्येक स्टेडियममध्ये सामने पाहण्यासाठी त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवली जाईल.

28 वर्षांनंतर धोनीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 चा वर्ल्ड कप 28 वर्षांनंतर जिंकला होता. त्यावेळी बीसीसीआयने खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला होता. वर्ल्ड कप संघातील प्रत्येक खेळाडूंना प्रत्येकी 2 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Uddhav Thackeray : ‘देशात मोदी-शहाच निवडणूक आयोग बनलाय’, ठाकरेंचा सामनातून हल्ला

2011 च्या वर्ल्ड कपची एकूण बक्षीस रक्कम 8 दशलक्ष यूएस डॉलर (66 कोटी) निश्चित करण्यात आली होती. त्याचवेळी ICC ने टीम इंडियाला सुमारे 25 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली होती. तर उपविजेत्या श्रीलंकेला 12.5 कोटी रुपये मिळाले होते.

ADVERTISEMENT

2023 वर्ल्ड कपची बक्षीस रक्कम किती?

वर्ल्ड कप चॅम्पियन संघाला ICC कडून 33.17 कोटी रुपये (4,000,000 USD) बक्षीस रक्कम मिळेल. तर उपविजेत्याला यापैकी निम्मी रक्कम मिळेल. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना समान रक्कम 6.63 कोटी रुपये (800,000 USD) मिळतील. याशिवाय, जर त्यांनी गट टप्प्यात सामना जिंकला तर त्यांना 33.17 लाख रुपये (40,000 USD) मिळतील. अंदाजे 82.95 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम (10,000,000 USD) वर्ल्ड कप 2023 मध्ये वितरित केली जा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT