IND vs AUS 3rd Test Day 3 : टीम इंडियावर पराभवाचं संकट,ऑस्ट्रेलियाला पहिल्या विजयाची आशा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

India vs Australia Indore Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगलेला तिसरा टेस्ट सामना खुपच रंगतदार स्थितीत पोहोचलाय. एकीकडे मायदेशात टीम इंडिया चार ही सामने जिंकण्याची आशा असताना दुसरीकडे तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने निकाल पालटला असून, विजयाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे लक्ष्य दिले आहे. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला आता आजचा दिवस पकडून तीन दिवसात पुर्ण करायचे आहेत. आता टीम इंडियाचे (Team India) गोलंदाज ऑस्ट्रेलियाला 76 धावात रोखण्यात यशस्वी ठरतात की ऑस्ट्रेलिया आपला पहिला वहिला विजय साकारते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.(ind vs aus 3rd test team india chances to loss indore test australia’s first victory hope)

ADVERTISEMENT

जडेजा-अश्विन जोडीकडून विजयाची अपेक्षा

टीम इंडियाने चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) 59 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दुसऱ्या डावात 163 धावा केल्या होत्या. या धावांमुळे टीम इंडियाने 76 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 76 धावांची आवश्यकता आहे. आता टीम इंडियाचे अनुभवी स्पिनर गोलदाज रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा ही जोडीच या सामन्यात करिश्मा करून दाखवू शकते.

Sandeep Deshpande: मोठी बातमी… मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

हे वाचलं का?

असा रंगला सामना

तिसऱ्या टेस्ट सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा त्याच्या निर्णय चुकीचा ठरला होता. कारण पहिल्याच डावात संपूर्ण संघ 109 धावांत ऑल आऊट झाला होता. या प्रत्युत्तरात कांगारू संघाने 197 धावा केल्या आणि 88 धावांची आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघ केवळ 163 धावाच करू शकला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे माफक लक्ष्य मिळाले.

कसब्यातल्या मतदारांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुन्हा येऊ!’

ADVERTISEMENT

दुसऱ्या डावात एकवेळ भारतीय संघ चांगल्या स्थितीत दिसत होता, तेव्हा 54 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे 250 हून अधिक धावा करून ऑस्ट्रेलियासमोर 150 हून अधिक धावांचे लक्ष्य ठेवू शकेल असे वाटत होते. मात्र ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने टीम इंडियाची ही योजना हाणून पाडली. नॅथन लायनने 64 धावा देत 8 विकेट घेतल्या आणि संपूर्ण भारतीय संघ 163 धावांवर आटोपला.

ADVERTISEMENT

टीम इंडियाकडून (Team India) ऑस्ट्रेलियाला 76 धावांचे माफक लक्ष्य मिळाले आहे.हे लक्ष्य पुर्ण करून ऑस्ट्रेलिया या कसोटीत पहिला विजय साकारणार आहे.दरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT