Virat kohli Records: सचिन तेंडुलकरनंतर कोहलीच! वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याच्या दिशेने सुसाट
Virat Kohli Test Century : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला आता टेस्टमध्येही सुरु गवसला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या शेवटच्या टेस्ट सामन्यात त्याने शतक ठोकले आहे. हे शतक ठोकून त्याने टेस्टमध्ये शतकांचा दुष्काळ संपवला आहे. विराटचे हे टेस्टमधले 28 तर आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधले 75 वे शतक ठोकले आहे. या शतकानंतर तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डच्या नजीक […]
ADVERTISEMENT
Virat Kohli Test Century : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला आता टेस्टमध्येही सुरु गवसला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या शेवटच्या टेस्ट सामन्यात त्याने शतक ठोकले आहे. हे शतक ठोकून त्याने टेस्टमध्ये शतकांचा दुष्काळ संपवला आहे. विराटचे हे टेस्टमधले 28 तर आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधले 75 वे शतक ठोकले आहे. या शतकानंतर तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डच्या नजीक पोहोचला आहे. त्यामुळे तो सचिनचा रेकॉर्ड मोडू शकतो असा आत्मविश्वास क्रिकेट फॅन्समध्ये आहे. (ind vs aus virat kohli centuries list most centuries in international cricket sachin tendulkar ricky ponting)
ADVERTISEMENT
साडेतीन वर्षांचा दुष्काळ
विराटच्या बॅटीतून गेल्या साडेतीन वर्षात एकही शतक आले नव्हते. या शतकांचा दुष्काळ आज अखेर त्याने संपवला आहे. विराटने तब्बल 1205 दिवस 41 डाव खेळल्यानंतर टेस्टमध्ये शतक झळकावले आहे.विराटच्या बॅटीतून याआधी 22 नोव्हेंबर 2019 ला शतक आले होते.त्यानंतर त्याला टेस्टमध्ये शतक झळकावताच आले नव्हते. आता त्याने साडे तीन वर्षानंतर टेस्टमध्ये शतक झळकावले आहे.
Ind Vs Aus: तीन वर्षानंतर अखेर प्रतिक्षा संपली, विराट कोहलीने ठोकलं शतक
हे वाचलं का?
विराट कोहली सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड तोडण्याच्या नजीक पोहोचतोय. सचिन तेंडूलकरच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक आहेत. सचिनने 664 सामन्यात ही शतक ठोकली आहेत. तर विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 75 शतक ठोकले आहेत. 494 सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे. त्यानंतर रिकी पॉटींगचा नंबर लागतो. पॉंटींगने 560 सामन्यात 71 शतक ठोकल्या आहेत. सध्या पॉटींग रिटायर्ड झाला आहे. त्यामुळे विराट कोहलीला सचिनचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
भारताच्या 571 धावा
शुबमन गिल आणि विराटच्या शतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने पहिल्या डावात 571 धावा केल्या आहेत. शुबमन गिलने 128, विराटने कोहलीने 186 आणि अक्षर पटेलने 79 धावा केल्या आहेत. या धावांच्या बळावर टीम इंडियानेही संख्या गाठलीय. ऑस्ट्रेलियाकडून नेथन लायन आणि टॉड मुर्फीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आहेत. तर मॅथ्यु आणि स्टार्कने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
ADVERTISEMENT
Ind vs Aus : अहमदाबाद कसोटी ड्रॉ झाली तर भारताचं काय होणार, कसं असेल WTCचं गणित?
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या आहेत. तर टीम इंडियाने 400 धावांचा पल्ला गाठलाय. टीम इंडिया पहिल्या डावात किती धावापर्यंत मजल मारते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.चार सामन्यांच्या टेस्ट मालिकेत टीम इडिया 2-1 ने आघाडीवर आहे. आता चौथा सामना ड्रॉ होतो की टीम इंडियाला विजयाची संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
PSL: 33 षटकार अन् 500 पेक्षा जास्त धावा, दोन संघानी मिळून बनवला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT