Ind Vs Aus: तीन वर्षानंतर अखेर प्रतिक्षा संपली, विराट कोहलीने ठोकलं शतक
Virat Kohli Test Century : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) खणखणीत शतक ठोकलं आहे. नोव्हेंबर 2019 नंतर त्यांच्या बॅटीतून हे शतक आले आहे. त्यामुळे तब्बल 3 वर्षानंतर म्हणजेच 1205 दिवसानंतर त्याने टेस्टमधला शतकाचा दुष्काळ संपवला आहे. या त्याच्या टेस्टची संपुर्ण क्रिकेट विश्व वाट बघत होते. अखेर हे […]
ADVERTISEMENT
Virat Kohli Test Century : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) खणखणीत शतक ठोकलं आहे. नोव्हेंबर 2019 नंतर त्यांच्या बॅटीतून हे शतक आले आहे. त्यामुळे तब्बल 3 वर्षानंतर म्हणजेच 1205 दिवसानंतर त्याने टेस्टमधला शतकाचा दुष्काळ संपवला आहे. या त्याच्या टेस्टची संपुर्ण क्रिकेट विश्व वाट बघत होते. अखेर हे शतक विराटच्या बॅटीतून आलेच. या त्याच्या शतकाने फॅन्समध्ये उत्साह आहे. (ind vs aus virat kohli heat century against australia 4th test and end the drought of century)
ADVERTISEMENT
शतकाचा दुष्काळ संपला
विराटने (Virat Kohli) या शतकासह टेस्टमध्ये 28 तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 75 वे शतक झळकावले आहे. विराटने हे शतक ठोकून शतकाचा दुष्काळ संपवला आहे. विराटने टी20, वनडे नंतर आता टेस्टमधला शतकाचा दुष्काळ संपवला आहे. विराट कोहलीच्या बॅटीतून 22 नोव्हेंबर 2019 रोजी शेवटचे शतक आले होते. या शतकानंतर तब्बल 3 वर्षानंतर आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने शतक ठोकले आहे.
Ind vs Aus : अहमदाबाद कसोटी ड्रॉ झाली तर भारताचं काय होणार, कसं असेल WTCचं गणित?
हे वाचलं का?
टेस्टमध्ये 28 वे शतक
ऑस्ट्रेलिया (Australia) विरूद्धच्या मालिकेत विराटला टेस्टमधला शतकाचा दुष्काळ संपवण्याची संधी होती. तीन सामन्यात त्याला ही संधी निर्माण करण्यात आली नाही.मात्र चौथ्या सामन्यात त्याने करून दाखवले आहे. चौथ्या सामन्यात विराटने टेस्टमधलं 28 वे शतक ठोकले आहे. 241 बॉलमध्ये त्याने हे शतक ठोकले आहे. या खेळीत त्याने फक्त 4 चौकार लावले आहेत. तर एकाही षटकाराचा समावेश नाहीए. त्याची ही खेळी पाहता तो किती संयमाने मैदानावर खेळला आहे, हे दिसून येत आहे.
The Man. The Celebration.
Take a bow, @imVkohli ??#INDvAUS #TeamIndia pic.twitter.com/QrL8qbj6s9
— BCCI (@BCCI) March 12, 2023
Rohit Sharma: रोहितची धोनी, तेंडुलकरच्या क्लबमध्ये एन्ट्री, ठरला 6वा भारतीय
ADVERTISEMENT
भारताच्या 400 धावा
विराटने कोहलीन (Virat Kohli) शतक झळकावताच टीम इंडियाने 400 धावांचा पल्ला गाठलाय. सध्या टीम इंडिया 450 धावाच्या नजीक पोहोचली आहे. विराटने 125 धावा तर अक्षर पटेल 21 धावावर खेळत आहे. टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियाच्या 40 धावा दूर आहे.आता टीम इंडिया पहिल्या डावात किती धावा करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विराट चांगल्या फॉर्ममध्ये आहे त्यामुळे जर त्याला दुसऱ्या खेळाडूने साथ दिली तर टीम इंडिया 500 धावांचाही आकडा सहज गाठेल.
ADVERTISEMENT
Ind vs Aus : दोन कर्णधार एकत्र! एक देशाचे दुसरा टीम इंडियाचा, व्हायरल फोटोवर भन्नाट कमेंट
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या आहेत. तर टीम इंडियाने 400 धावांचा पल्ला गाठलाय. टीम इंडिया पहिल्या डावात किती धावापर्यंत मजल मारते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.चार सामन्यांच्या टेस्ट मालिकेत टीम इडिया 2-1 ने आघाडीवर आहे. आता चौथा सामना ड्रॉ होतो की टीम इंडियाला विजयाची संधी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT