इंग्लंडची पहिल्या इनिंगमध्ये ५७८ पर्यंत मजल, भारतासमोर मोठं आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चेन्नई टेस्टमध्ये जो रुटच्या इंग्लंड टीमने भारतीय संघासमोर पहिल्या इनिंगमध्ये ५७८ रन्स करत मोठं आव्हान तयार केलंय. जो रुटने केलेल्या २१८ रन्स आणि त्याला डोम सिबले आणि बेन स्टोक्स यांनी दिलेली उत्तम साथ या जोरावर इंग्लंडने चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सच्या नाकीनऊ आणले. टीम इंडियाच्या बॉलर्सना पहिल्याच टेस्टमध्ये प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली.

ADVERTISEMENT

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडचा संघ ५५५ रन्सपर्यंत पोहचला होता. त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये अधिकाधिक स्कोअर करुन भारताला झटपट बाद करण्याचा प्रयत्न इंग्लंड करणार हे साफ दिसत होतं. तिसऱ्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडच्या टेलएंडर्सनी झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण बुमराह आणि आश्विनने त्यांना झटपट गुंडाळत इंग्लंडची पहिली इनिंग संपवली. भारताकडून बुमराह आणि आश्विनने प्रत्येकी ३-३ तर इशांत आणि नदीमने २-२ विकेट घेतल्या.

चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेअर्सची सुमार फिल्डींग चर्चेचा विषय ठरली. ऋषभ पंतने यंदाच्या टेस्ट मॅचमध्येही विकेटकिपींग करत असताना काही संधी सोडल्या आणि पुन्हा एकदा आपल्या टीकाकारांना संधी दिली. याचसोबत चेपॉकच्या पिचकडून बॉलर्सना फारशी मदत मिळाली नाही. त्यामुळे पहिल्या सेशनवर इंग्लंडने आपलं पुरेपूर वर्चस्व गाजवलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT