Ind vs Eng : अहमदाबादमध्ये मुंबईचा ‘सूर्य’तळपला, टी-२० क्रिकेटमध्ये पहिली हाफ सेंच्युरी
मुंबईच्या सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यात आपली चमक दाखवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. चांगल्या सुरुवातीनंतर पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला सूर्यकुमारने आपल्या खेळीने सावरलं. अहमदाबादच्या मैदानात चौफर फटकेबाजी करत सूर्यकुमारने संघातली आपली निवड सार्थ ठरवली. चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने आपल्या बॅटींग लाईनअपमध्ये बदल केले. विराट कोहलीने आपल्या जागेवर सूर्यकुमार यादवला संधी […]
ADVERTISEMENT
मुंबईच्या सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यात आपली चमक दाखवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. चांगल्या सुरुवातीनंतर पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला सूर्यकुमारने आपल्या खेळीने सावरलं. अहमदाबादच्या मैदानात चौफर फटकेबाजी करत सूर्यकुमारने संघातली आपली निवड सार्थ ठरवली.
ADVERTISEMENT
चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने आपल्या बॅटींग लाईनअपमध्ये बदल केले. विराट कोहलीने आपल्या जागेवर सूर्यकुमार यादवला संधी दिली. सूर्यकुमारनेही या संधीचं पुरेपूर सोनं करत अर्धशतक झळकावलं आणि भारतीय संघाचा डाव सावरला. टीम इंडियाकडून पहिलीच इनिंग खेळताना हाफ सेंच्युरी करणाऱ्या मोजक्या बॅट्समनच्या लिस्टमध्ये आता सूर्यकुमार यादवला स्थान मिळालं आहे.
50s in Maiden T20I inning for India
Robin Uthappa vs PAK (2007)
Rohit Sharma vs SA (2007)
Ajinkya Rahane vs ENG (2011)
Ishan Kishan vs ENG (2021)
Suryakumar Yadav vs ENG (Today)*#INDvsENG— CricBeat (@Cric_beat) March 18, 2021
दरम्यान ३१ बॉलमध्ये ५७ रन्सची इनिंग खेळून सूर्यकुमार करनच्या बॉलिंगवर आऊटही झाला. त्याआधी लोकेश राहुलसोबत ओपनिंगला आलेल्या रोहित शर्माने आदिल रशिदच्या पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स लगावत आगळंवेगळं अर्धशतक साजरं केलं. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणाऱ्या बॅट्समनच्या यादीत रोहित आता पहिल्या स्थानावर आहे. दरम्यान आक्रमक सुरुवात केल्यानंतरही रोहित या मॅचमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही. अवघ्या १२ रन्स करुन जोफ्रा आर्चरच्या बॉलिंगवर रोहित कॅचआऊट झाला.
हे वाचलं का?
Ind vs Eng : पहिल्याच बॉलवर रोहित शर्माची हाफ सेंच्युरी, भारताची चांगली सुरुवात
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT