IND vs NZ ODI : न्यूझीलंडचेही दमदार प्रत्युत्तर; अखेरच्या षटकात भारताचा विजय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IND vs NZ ODI 1st odi :

ADVERTISEMENT

हैदराबाद : भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने १२ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या षटकापर्यंत चालेल्या हाय स्कोरींग सामन्यात भारताकडून शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी दमदार कामगिरी केली. सुरुवातील नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत आठ गडी गमावून ३४९ धावा केल्या. तर न्यूझीलंडचा डाव ३३७ धावांवरच आटोपला.

सुरुवातीला नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी हा निर्णय सार्थ ठरवतं पॉवरप्लेमध्ये शानदार फलंदाजी केली. पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाने एकही विकेट न गमावता ५२ धावा केल्या होत्या. पॉवरप्लेनंतर मात्र रोहित शर्मा ३८ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला विराट कोहली आणि ईशान किशन हे दोघेही स्वस्तात माघारी परतले.

हे वाचलं का?

सुर्यकुमार यादवही मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. सूर्यकुमार २६ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला शुभमन गिल मात्र किल्ला लढवत होता. या सामन्यात गिलची झंझावती खेळी पाहायला मिळाली. या सामन्यात त्याने क्रिकेट कारकिर्दीमधील पहिले द्विशतक झळकावत विक्रम रचला. शुभमनने हार्दिकला जोडीला घेत अर्धशतकी भागीदारी रचली. अखेर १४९ चेंडूत २०८ धावा काढून शुभमन बाद झाला. 

भारताने दिलेल्या ३५० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. डेव्हन कॉनवे १६ चेंडूत १० धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला झेलबाद केलं. पाठोपाठ शार्दुल ठाकूरने १३व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ऍलनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ७८ धावांवरच न्यूझीलंडची तिसरी विकेट पडली. ८९ धावांवर असताना कुलदीपने भारताला चौथे यश मिळवून दिले.

ADVERTISEMENT

मोहम्मद शमीने २५व्या षटकात फिलिप्सला क्लीन बोल्ड केले आणि न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. मोहम्मद सिराजने टॉम लेथमला बाद करत न्यूझीलंडला सहावा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी न्यूझीलंडची धुरा सांभाळली. दोघांनीही सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. या दरम्यान, मायकेल ब्रेसवेलने वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. मात्र तोही न्यझीलंडला विजय मिळवून देऊ शकला नाही. सिराजने या सामन्यात चार बळी घेत भारताच्या विजयात मोठा हातभार लावला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT