World Cup 2023 : भारताच्या श्रीलंकेविरूद्ध विजयासाठी पाकिस्तानची प्रार्थना; समजून घ्या सेमी फायनलचं गणित

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

india vs srilanka match world cup 2023 pakistan team semi final scenario in world cup
india vs srilanka match world cup 2023 pakistan team semi final scenario in world cup
social share
google news

India vs Srilanka Match, World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडिया (Team India) श्रीलंकेशी (Srilanka) भिडणार आहे. मुंबईच्या वानखडे स्टेडिअमवर या सामन्याला 2 वाजता सुरूवात होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया जिंकल्यास सेमी फायनल (Semi Final) स्थान पक्क होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट फॅन्स टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करतात. विशेष म्हणजे भारतासोबत पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स देखील भारताला चिअर करत आहे. त्यामुळे पाकिस्तानी (Pakistan) फन्सच्या चिअर करण्यामागे सेमी फायनलचं गणित लपलं आहे. (india vs srilanka match world cup 2023 pakistan team semi final scenario in world cup)

साऊथ आफ्रिका आणि टीम इंडिया 12-12 गुणांसह पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी सेमी फायनलमध्ये आधीच पोहोचली आहे. त्यामुळे आता सेमी फायनल लढतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी 7 संघांमध्ये लढत सूरू आहे. तर यामध्ये बांग्लादेश संघ आधीच या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सगळ्यात पाकिस्तानचा संघही हळूहळू सेमी फायनलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. जरी सेमी फायनल पर्यंत पोहोचण्याची शक्यता खुपच कमी असली तरी. त्यामुळे आता पाकिस्तानला उर्वरित सामने जिंकण्याबरोबरच भारत आणि अफगाणिस्तानसह इतर संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून राहावे लागणार आहे.

हे ही वाचा : Maratha Reservation : आरक्षण आंदोलनात भाजप फसलं? समजून घ्या राजकारण

वानखडेच्या मैदानात आज टीम इंडिया आज श्रीलंकेविरूद्ध सामना खेळणार आहे. जर टीम इंडियाने आजचा सामना जिंकला तर त्यांचे सेमी फायनलमधील स्थान पक्क होणार आहे. आणि जर श्रीलंकेने हा सामना गमावला तर तो सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे. अशात पाकिस्तान संघ टीम इंडियाच्या विजयाची प्रार्थना करत आहे. कारण श्रीलंका बाहेर झाल्यास पाकिस्तान संघ सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याआधी 1 नोव्हेंबरला साऊथ आफ्रिकाने न्युझीलंडचा 190 धावांनी पराभव करून पाकिस्तान संघाला जबरदस्त मदत केली होती. न्युझीलंडच्या पराभवाचा पाकिस्तानला चांगला फायदा झाला. आता भारताने श्रीलंकेचा पराभव केल्यास यामध्ये देखील पाकिस्तानला फायदा होणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation : मराठा आंदोलनात केतकी चितळेची उडी, व्हिडिओ केला शेअर; म्हणाली…

टीम इंडियाच्या विजयासोबत न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान संघाचा पराभव व्हावा अशीही प्रार्थना पाकिस्तान करतोय. यासोबत पाकिस्तान संघाला त्याचे उरलेले दोन सामने जिंकावे लागणार आहेत. जर पाकिस्तान संघाचा दोन्ही सामन्यापैकी एकही सामन्यात पराभव झाला तर ते सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT