IND vs BAN Series : भारतीय क्रिकेटरला फ्लाईटमध्ये वाईट वागणूक; जेवन दिलं नाही, लगेजही हरवलं
IND vs BAN मालिका: भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये पोहोचला आहे. मात्र याचदरम्यान एका भारतीय क्रिकेटपटूसोबत फ्लाइटमध्ये गैरवर्तन केल्याची बातमी समोर आली आहे. हा खुलासा खुद्द क्रिकेटपटूने केला आहे. खरे तर हा खेळाडू आहे स्टार गोलंदाज […]
ADVERTISEMENT
IND vs BAN मालिका: भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये पोहोचला आहे. मात्र याचदरम्यान एका भारतीय क्रिकेटपटूसोबत फ्लाइटमध्ये गैरवर्तन केल्याची बातमी समोर आली आहे. हा खुलासा खुद्द क्रिकेटपटूने केला आहे.
ADVERTISEMENT
खरे तर हा खेळाडू आहे स्टार गोलंदाज दीपक चहर. याआधी तो भारतीय संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. येथून त्याने थेट ढाका गाठले आणि बांगलादेश मालिकेसाठी भारतीय संघात सामील झाला. यादरम्यान फ्लाइटमध्ये त्यांला वाईट वागणूक देण्यात आली.
24 तासांपासून सामानाची प्रतिक्षा करतोय चहर
दीपक चहर याने ट्विट करून ही माहिती दिली. त्याने सांगितले की तो मलेशियन एअरलाइन्सने ढाकाला पोहोचला आहे. त्याने बिझनेस क्लासमध्ये प्रवास केला. असे असतानाही त्याला जेवणही देण्यात आले नाही. मोठी गोष्ट म्हणजे विमान एअरलाईन्सने सामानही हरवले. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना रविवारी (४ डिसेंबर) असून तो २४ तासापासून त्याच्या सामानाची वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत तयारी कशी करावी?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे वाचलं का?
दीपकने शनिवारी हे ट्विट केले होते, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, ‘मलेशियन एअरलाइन्समध्ये प्रवास करणे हा खूप वाईट अनुभव होता. सर्वप्रथम त्यांनी मला न कळवता आमची फ्लाइट बदलली. बिझनेस क्लासमध्ये जेवणही दिले जात नव्हते. आता आम्ही गेल्या 24 तासांपासून आमचा सामान मिळण्याची वाट पाहत आहोत. विचार करा उद्या (रविवार) आम्हाला सामना खेळायचा आहे, असं तो म्हणाला.
मलेशियन एअरलाइन्सने चहरला तक्रार करण्यासाठी लिंक पाठवली आहे. मात्र यावर दीपक चहर म्हणाला की, ही लिंकही ओपन होत नाहीये. मलेशिया एअरलाइन्सने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली, ‘हे ऑपरेशनल, हवामान आणि तांत्रिक कारणांमुळे होऊ शकते. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT