ODI Cricket : भारतासाठी रणजी खेळणाऱ्याचं सर्वत्र होतंय कौतुक! 'असा' कारनामा करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू
Milind Kumar In USA Cricket : क्रिकेटच्या मैदानात काही खेळाडू ऐतिहासिक कामगिरी करतात, जे पाहून संपूर्ण जगभरातील क्रिकेटपटूांना आश्चर्याचा धक्का बसतो. असाच कारनामा भारतीय वंशाच्या यूएसएच्या खेळाडूने केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भारतीय वंशाच्या खेळाडूने वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास
अमेरिकेच्या संघातून खेळताना 'त्या' फलंदाजाने विश्वविक्रमच केला
'अशी' कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज
Milind Kumar In USA Cricket : क्रिकेटच्या मैदानात काही खेळाडू ऐतिहासिक कामगिरी करतात, जे पाहून संपूर्ण जगभरातील क्रिकेटपटूांना आश्चर्याचा धक्का बसतो. असाच कारनामा भारतीय वंशाच्या यूएसएच्या खेळाडूने केला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये सौरभ नेत्रावलकरला चमकदार कामगिरी करताना पाहिलं होतं. त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. आता यूएसएच्या आणखी एका खेळाडूने कमाल केली आहे, जे पाहून विश्वक्रिटेमध्ये खळबळ उडाली आहे.
वनडेत अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज
मिलिंद कुमारने वनडेत मोठा कारनामा केला आहे. यूएसएचे मिलिंद कुमार वनडे क्रिकेटच्या इतिहासात एकमेव फलंदाज ठरला आहे, ज्याने 155 धावांची नाबाद खेळी केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये 53 वर्षांच्या इतिहासात मिलिंदने 155 धावा करून इनिंग समाप्त करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. वनडेत कोणत्याही फलंदाजाने 155 धावांची नाबाद खेळी याधीच कधीच खेळली नाही.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! तुमची प्रतिक्षा संपली, 'या' दिवशी जमा होणार तिसऱ्या हफ्त्याचे पैसे
आजपर्यंत वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूने 150 ते 159 पर्यंत धावा करणारे 63 वेगवेगळे उदाहरण राहिले आहेत. पण मिलिंदची खेळी पहिली अशी इनिंग आहे, जी बरोबर 155 धावांवर समाप्त झाली. यूएसएच्या सामन्यादरम्यान मिलिंदने हा अनोखा कारनामा केला आहे. आपल्या इनिंगमध्ये यूएसएच्या या फलंदाजाने 16 चौकार आणि 5 षटकार ठोकले आहेत. मिलिंदच्या खेळीच्या जोरावर यूएसएच्या टीमने हा सामना 136 धावांनी जिंकला. त्यानंतर यूएईच्या संघाला फक्त 203 धावाच करता आल्या.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
भारतासाठी रणजी खेळलाय मिलिंद
मिलिंदने रणजी ट्रॉफीत दिल्लीच्या संघाची पदार्पण केलं होतं. तो भारताच्या घरेलू क्रिकेटमध्ये सिक्कीम आणि त्रिपुरा संघासाठीही खेळला आहे. घरेलू क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याला भारतीय संघात संधी मिळाली नाही. त्यानंतर मिलिंदने अमेरिकेत जाऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये मिलिंद अमेरिकेत मायनर लिग क्रिकेटमध्ये सामील झाला होता. वर्ष 2024 मध्ये मिलिंदने कॅनडा विरोधात टी-20 सामना खेळून अमेरिकेसाठी पदार्पण केलं होतं. मलिंदचा जन्म दिल्लीत झाला होता. अष्टपैलू खेळाडू म्हणून मिलिंदची ख्याती आहे. मिलिंदने 2018-19 च्या रणजी सीजनमध्ये सर्वात जास्त धावा केल्या होत्या. त्याने या सीजनमध्ये एकूण 1331 धावा केल्या होत्या.
हे ही वाचा >> '...म्हणून आम्ही लाडकी बहीण योजनेचा जुगाड केला', भाजप आमदाराचं खळबळजनक वक्तव्य, Video प्रचंड व्हायरल
ADVERTISEMENT