टीम इंडियाच्या महिला संघाने रचला इतिहास, Asian Gameमध्ये सुवर्णपदक पटकावत पाकिस्तानला धक्का
Indian Womens team won gold medal Asian Game : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एशियन गेम्समध्ये इतिहास रचला आहे. टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने या स्पर्धेत पहिलं वहिलं गोल्ड जिंकलं आहे. श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करून टीम इंडियाने हे पदक जिंकले आहेत.
ADVERTISEMENT
Indian Womens team won gold medal Asian Game : कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet kaur) नेतृत्वाखाली टीम इंडियाने एशियन गेम्समध्ये (Asian Game) इतिहास रचला आहे. टीम इंडियाच्या (Team India) महिला ब्रिगेडने या स्पर्धेत पहिलं वहिलं गोल्ड जिंकलं आहे. श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करून टीम इंडियाने हे पदक जिंकले आहेत. त्यामुळे एशियाडमधील पुरुष आणि महिला क्रिकेटमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. त्याचसोबत टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडने भारताला दिवसातील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. याआधी भारताला या एशियाडमधील पहिले सुवर्ण नेमबाजीत मिळाले होते. (indian women beat sri lanka women asian game won gold medal harmanpreet kaur)
ADVERTISEMENT
टीम इंडियाच्या महिला संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.टीम इंडियाकडून स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा सलामीला उतरली होती. पण शफाली वर्मा अवघ्या 9 धावा करून बाद झाली होती. यानंतर स्मृती आणि जेमिमाने भारताचा डाव सावरला होता. स्मृती मंधानाने 45 बॉलमध्ये 46 धावा केल्या होत्या, तर जेमिमाने 40 चेंडूत 42 धावा केल्या आहेत. या धावांच्या बळावर टीम इंडियाने 7 विकेट गमावून 117 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून सुगंधिका, प्रबोधिनी कुमारी, रणविरा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या होत्या.
हे ही वाचा : Crime : माणुसकीला काळीमा! 1500 रूपयांसाठी अनुसूचित जातीच्या महिलेला नग्न करून मारहाण,चेहऱ्यावर लघवी…
Gold for India 🥇
Harmanpreet Kaur’s side beat Sri Lanka in the thrilling #AsianGames Women’s T20I Final 🔥
📝 https://t.co/NdufO4iSlY pic.twitter.com/ft5ZkihyJu
— ICC (@ICC) September 25, 2023
हे वाचलं का?
टीम इंडियाने दिलेल्या 117 धावांचा पाठलाग करायला उतरलेली श्रीलंका 8 विकेट गमावून 97 धावाच करू शकली. त्यामुळे टीम इंडियाने श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करून सुवर्णपदक जिंकले. टीम इंडियाकडून तितास साधुने 6 धावा देऊन 3 विकेट घेतल्या, तर राजेश्वरी गायकवाडने 20 धावा देऊन 2 विकेट घेतल्या.
पाकिस्तानला मोठा धक्का
एशियन गेम्समध्ये टीम इंडियाच्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकुन पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत 2010 आणि 2014 साली एशिय़न गेम्समध्ये पाकिस्तानने सुवर्णपदक जिंकले होते. मात्र यावर्षी श्रीलंकेने सेमी फायनल सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे फायनल सामन्यात टीम इंडिया आणि श्रीलंका भिडले. आणि टीम इंडियाने श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : MLA disqualification case : सुनावणीत काय घडलं? ठाकरेंच्या नेत्याने सांगितली Inside Story
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT