IND vs NZ : न्यूझीलंडला क्लिन स्वीप; तिसरी वनडे जिंकून भारत ‘अव्वल स्थानी’
IND vs NZ 3rd ODI : इंदौर : येथील होळकर स्टेडियमवर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने (India) न्यूझीलंडचा (New Zealand) तब्बल ९० धावांनी लोळवलं. याशिवाय ३-० अशी मालिका जिंकून न्यूझीलंडला क्लिन स्विप देत वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानही पटकावलं आहे. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉन्वेने १३६ धावांची झुंजार खेळी केली. पण शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांच्या तिखट माऱ्याने […]
ADVERTISEMENT

IND vs NZ 3rd ODI :
इंदौर : येथील होळकर स्टेडियमवर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने (India) न्यूझीलंडचा (New Zealand) तब्बल ९० धावांनी लोळवलं. याशिवाय ३-० अशी मालिका जिंकून न्यूझीलंडला क्लिन स्विप देत वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानही पटकावलं आहे. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉन्वेने १३६ धावांची झुंजार खेळी केली. पण शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांच्या तिखट माऱ्याने भारताला विजयी केलं. (India’s victory over New Zealand in Indore completed a clean sweep in the three-match ODI series.)
सुरुवातील टॉस जिंकत न्यूझीलंडने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात करत २१२ धावांची सलमी दिली. शुभमन गिलने ११२ धावांची तर रोहितने १०१ धावांची शतकी खेळी केली. मात्र या दोघांच्या विकेट्स पडल्यानंतर भारताचा डाव गडगडला. विराट कोहली, इशान किशन, सुर्यकुमार यादव हे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले.
IND vs NZ ODI : न्यूझीलंडचेही दमदार प्रत्युत्तर; अखेरच्या षटकात भारताचा विजय










