IPL 2021 : KKR अंतिम फेरीत आल्यामुळे CSK च्या चिंता वाढल्या, फायनलचा इतिहास कोलकात्याच्या बाजूने

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात KKR ने अटीतटीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. शुक्रवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यात विजेतेपदाची लढाई होणार आहे. परंतू या लढाईआधी चेन्नईच्या संघासमोर चिंता वाढल्या आहेत.

ADVERTISEMENT

यंदाच्या हंगामात चेन्नईचा संघ चांगल्याच फॉर्मात आहे, असं असतानाही इतिहासातली एक आकडेवारी CSK साठी धोकादायक ठरु शकते.

IPL 2021 : KKR जितबो रे…अंतिम फेरीत चेन्नईसोबत विजेतेपदासाठी लढणार

हे वाचलं का?

अंतिम फेरीत प्रवेश करण्याची चेन्नईची ही नववी वेळ ठरली आहे. याआधीच्या ८ पैकी ३ वेळा चेन्नईच्या संघाने स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे. पण या तुलनेत कोलकाता नाईट रायजर्सचा संघ दोनदा अंतिम फेरीत दाखल झाला होता आणि या दोन्ही वेळी कोलकात्याने स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. २०१२ आणि २०१४ सालची विजेतेपद कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर जमा आहेत.

IPL BLOG: देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी!

ADVERTISEMENT

२०१२ साली कोलकात्याने चेन्नईवरच मात करत बाजी मारली होती. त्यामुळे शुक्रवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्सचा संघ २०१२ च्या निकालाची पुनरावृत्ती करु शकतो.

ADVERTISEMENT

कोलकाता नाईट रायडर्सचा विजेतेपदांचा इतिहास –

  • २०१२ – चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करुन पहिल्यांदा विजेतेपद मिळवलं.

  • २०१४ – किंग्ज इलेव्हन पंजाब (आताचा पंजाब किंग्ज) ला हरवून दुसरं विजेतेपद मिळवलं.

चेन्नई सुपरकिंग्जचा विजेतेपदांचा इतिहास –

  • २००८ – राजस्थान रॉयल्सकडून पराभूत

  • २०१० – मुंबईला पराभूत करुन पहिलं विजेतेपद

  • २०११ – RCB ला पराभवाचा धक्का देत लागोपाठ दुसरं विजेतेपद

  • २०१२ – KKR ने CSK ची हॅटट्रीकची संधी हिरावली

  • २०१३ – मुंबई इंडियन्सकडून पराभूत

  • २०१५ – मुंबई इंडियन्सकडून पराभूत

  • २०१८ – सनराईजर्स हैदराबादला हरवून जिंकलं तिसरं विजेतेपद

  • २०१९ – मुंबई इंडियन्स कडून पराभूत

दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघात आयपीएल २०२१ चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा महामुकाबला १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT