SRH vs RR : राजस्थानच्या भेदक माऱ्यासमोर ‘हैदराबाद’ची दमछाक! ६१ धावांनी चारली धूळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नाणेफेक हरल्यानंतरही राजस्थानने फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर शानदार विजय मिळवला. राजस्थानच्या फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत मोठं आव्हान ठेवलं. दोनशे पार धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या फलंदाजांची दमछाक झाली. हैदराबादला २० षटकात ७ बाद १४९धावांपर्यंतच मजल मारता आली.

नाणेफेक जिंकून हैदराबाद सनरायझर्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या राजस्थानच्या दोन्ही सलामीवीरांनी जिवदानाचा फायदा घेत संघाला चांगली सुरूवात करून दिली. सलामीवीर जॉस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांनी पहिल्या पावर प्लेमध्ये फटकेबाजी केली.

राजस्थानची धावसंख्या ५८ असताना ७व्या षटकात यशस्वी जायस्वाल बाद झाला. यशस्वीने १६ चेंडूत २० धावा केल्या. त्यानंतर ७५ धावसंख्या असताना जॉस बटलर (२८ चेंडूत ३५ धावा) बाद झाला. बटलरला उमरान मलिकने माघारी पाठवले. त्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कलने हैदराबादच्या गोलंदाजांवर आक्रमणच केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आयपीएलमध्ये शंभरावा सामना खेळत असलेल्या संजू सॅमसनने षटकार-चौकारांची आतषबाजी करत अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. मात्र, आणखी ५ धावांची भर घालून सॅमसन (२७ चेंडूत ५५ धावा)बाद झाला. देवदत्त पडिक्कलने २९ चेंडूत ४१, तर अखेरच्या काही षटकात हेटमायर (१३ चेंडू ३२ धावा) आणि परागने (९ चेंडू १२ धावा) फटकेबाजी केली. फलंदाजांनी केलेल्या झटपट धावांच्या बळावर राजस्थानने हैदराबादसमोर २११ धावांचं आव्हान ठेवलं.

हैदराबादचे फलंदाज राजस्थानच्या जाळ्यात

२११ धावांचा आव्हान करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर केन विल्यमसनला सुरुवातीलाच जीवदान मिळालं, मात्र त्याला जीवदानाचा फायदा घेता आला नाही. डाव्याच्या दुसऱ्याच षटकात प्रसिद्ध कृष्णाने विल्यमसन बाद केलं. त्यानंतर चौथ्या षटकात राहुल त्रिपाठीला प्रसिद्ध कृष्णाने झेलबाद केलं.

ADVERTISEMENT

निकोलस पूरनलाही मोठी खेळी करता आली नाही. विल्यमसन आणि त्रिपाठी पाठोपाठ पूरन शून्यावर बाद झाला, तर अभिषेक शर्मा युजवेंद्र चहलला मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट गमावून बसला. दहा षटकात हैदराबादचा निम्मा संघ राजस्थानच्या गोलंदाजांनी माघारी पाठवला.

त्यानंतर ठराविक अंतराने हैदराबादचे फलंदाज बाद झाले. हैदराबादकडून मार्करमने सर्वाधिक ५७ धावा केल्या, तर अखेरीस आलेल्या वाशिंग्टन सुंदरने झटपट १४ चेंडूत ४० धावांची खेळी केली. हैदराबादकडून युजवेंद्र चहलने ४ षटकात २२ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले. तर प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी दोन बळी घेतले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT