Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. बीसीसीआयचे अधिकृत निवेदन अद्याप आलेले नाही.

ADVERTISEMENT

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया मालिकेतच पुनरागमन केले, त्याआधी तो दुखापतीमुळे बाहेर गेला होता. मात्र पुनरागमनानंतर तो केवळ दोनच सामने खेळू शकला, तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो प्लेइंग-11 मध्ये दिसला नव्हता. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया कप-2022 मध्ये भाग घेऊ शकला नव्हते आणि भारतीय संघ सुपर-4 मधूनच बाहेर पडला होता.

जसप्रीत बुमराह पाठिच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर

पाठीच्या समस्येमुळे जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी-20 सामनाही खेळू शकला नव्हता. पण आता असे सांगण्यात येत आहे की ही समस्या अधिक गंभीर आहे आणि फ्रॅक्चर सारखी असू शकते, त्यामुळे जसप्रीत बुमराहला जवळपास 6 आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागू शकते.

हे वाचलं का?

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

ADVERTISEMENT

दुखापतीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!

टी-20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा झाल्यापासून टीम इंडियाचे टेन्शनस काही कमी होत नाहीये. पहिलं रवींद्र जडेजा दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला होता. त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर संघात समाविष्ट असलेला दीपक हुड्डाही नुकताच दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर व्हावे लागले. आणि आता जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

ADVERTISEMENT

जसप्रीत बुमराहची जागा कोण घेणार?

जसप्रीत बुमराह टी- 20 विश्वचषकातून बाहेर पडणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. अशा स्थितीत आता त्याच्या जागी कोणाचा संघात समावेश होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या दीपक चहर आणि मोहम्मद शमी स्टँडबाय खेळाडूंचा यादीत आहेत, त्यामुळे त्यांच्यापैकी एकाचा मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो. आयसीसीच्या नियमांनुसार 15 ऑक्टोबरपर्यंत टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या मुख्य संघात बदल करू शकते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT