अहमदाबादच्या पिचवरुन मायकल वॉनने टीम इंडियाला पुन्हा डिवचलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत आणि इंग्लंड यांच्यातली अखेरची टेस्ट मॅच गुरुवारपासून अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या मॅचसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाही इंग्लंडचे माजी प्लेअर्स तिसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या मानहानीकारक पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले दिसत नाहीयेत. विशेषकरुन इंग्लंडचा माजी क्रिकेट कॅप्टन मायकल वॉनने अहमदाबादच्या पिचवरुन टीम इंडिया आणि बीसीसीआयला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

ADVERTISEMENT

आपल्या घराबाहेर मातीमध्ये बॅटींगसाठी उभं राहतानाचा एक फोटो पोस्ट करत वॉनने चौथ्या टेस्ट मॅचसाठीची तयारी जोरात सुरु असल्याचं म्हटलंय.

याआधीही वॉनने भारतामधील एक शेतकरी शेतात नांगरणी करत असतानाचा फोटो पोस्ट करत चौथ्या टेस्टसाठी पिच बनवण्याचं काम जोरात सुरु असल्याची मिश्कील पोस्ट करत टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

हे वाचलं का?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या डे अँड नाईट टेस्ट मॅचमध्ये भारताने दोन दिवसांत इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. स्पिनर्सनी हा सामना गाजवत विकेट घेण्याचा धडाका सुरु ठेवल्यामुळे इंग्लंडच्या संघाची दाणादाण उडालेली पहायला मिळाली. तिसऱ्या टेस्ट मॅचमधील पराभवानंतर इंग्लंडचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. दुसरीकडे भारताला अखेरच्या टेस्टमध्ये विजय किंवा किमान सामना ड्रॉ करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळे अखेरच्या टेस्ट मॅचसाठी टीम इंडिया काय स्ट्रॅटजी घेऊन मैदानात उतरणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT