Mohmmad Siraj : मोहम्मद सिराजने दाखवला मनाचा मोठेपणा, श्रीलंकेच्या ग्राऊंड्समन्सना दिलं मोठं गिफ्ट
मोहम्मद सिराजला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार आणि त्याची रक्कम आता त्याने श्रीलंकेच्या ग्राऊंड्समन्स स्टाफला दिली आहे. त्यामुळे त्याच्या या कृतीचे क्रिकेट वर्तुळात कौतूक होत आहे.
ADVERTISEMENT
टीम इंडियाने आशिया कपचा फायनल सामना 10 विकेट्स राखून जिंकला आहे. टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार मोहम्मद सिराज (mohammed siraj) ठरला आहे. मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरूद्ध भेदक गोलंदाजी करून 6 विकेट घेतल्या आहेत. या 6 विकेट्सने श्रीलंका बॅकफूटवर गेली आणि अवघ्या 50 धावावर ऑल आऊट झाली. त्यामुळे भारताने सहज एकही विकेट न गमावता हा सामना जिंकला. या विजयानंतर मोहम्मद सिराजला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार आणि त्याची रक्कम आता त्याने श्रीलंकेच्या ग्राऊंड्समन्स स्टाफला दिली आहे. त्यामुळे त्याच्या या कृतीचे क्रिकेट वर्तुळात कौतूक होत आहे. (mohammed siraj giver man of the match prize money to srilankan ground staff colombo india vs sri lanka asia cup 2023)
ADVERTISEMENT
श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात मोहम्मद सिराजने 7 ओव्हरमध्ये 6 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजची ही क्रिकेट करिअरमधली सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. त्याच्या या कामगिरीच्या बळावर त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार आता त्याने श्रीलंकेच्या ग्राऊंड्समन्स स्टाफला दिला आहे. सिराजला पुरस्कारासह 5 हजार डॉलर म्हणजेच (4 लाख रूपये) ही रोख रक्कम मिळाली. सिराजने ही सर्व रोखरक्कम श्रीलंकेच्या ग्राऊंडस्टाफला दिली आहे. सिराजने ग्राऊंड्समन्स प्रती दाखवलेल्या या कृतीचे आता क्रिकेट वर्तुळात कौतूक होत आहे.
हे ही वाचा : लालबागच्या राजाच्या पायावर छत्रपतींच्या ‘राजमुद्रा’ने वाद! संभाजीराजे भडकले
ही रोख पुरस्कार मी ग्राऊंड्समनला देतो, ज्यांच्यामुळे हा आशिया कप यशस्वीरीत्या पार पडू शकला. त्यामुळे ते या पुरस्काराचे खरी मानकरी आहेत. त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण होई शकली नसती, असे मोहम्मद सिराज यावेळी म्हणाला आहे.
हे वाचलं का?
बीसीसीआय़कडून मिळालं बक्षीस
आशिया कप दरम्यान श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या अनेक सामन्यांमध्ये पाऊस पडला होता. अशा परिस्थितीत मैदान आणि खेळपट्टी खेळण्यायोग्य बनवण्यात ग्राउंड्समन आणि पिच क्युरेटर्सनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व स्टाफना 42 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
जय शाह यांनी एक पोस्ट पोस्ट केली, “आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि श्रीलंका क्रिकेट (SLC) यांना कोलंबो आणि कॅंडीच्या मैदानी खेळाडूंसाठी 50,000 अमेरीकन डॉलर ( भारतीय चलनानुसार 42 लाख रुपये) ची बक्षीस रक्कम जाहीर करताना अभिमान वाटतो. “त्यांची वचनबद्धता आणि मेहनत यामुळे आशिया कप 2023 अविस्मरणीय ठरला, असे जय शाह म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Mohammed Siraj Record : मोहम्मद सिराजने रचला इतिहास, एकाच सामन्यात मोडले ‘हे’ रेकॉर्ड
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT