Paris Olympic 2024: भारतीय हॉकी संघ मेडलपासून एक पाऊल दूर, शुटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा उडवला धुव्वा

मुंबई तक

ADVERTISEMENT

paris olympic 2024 indian hockey team beat great britain penalty shootout reach semi final
भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताने ग्रेट ब्रिटनचा शुटआऊटमध्ये केला पराभव

point

शुटआऊटमध्ये 4-2 ने उडवला धुव्वा

point

या विजयासह भारताची सेमी फायनलमध्ये एन्ट्री

India vs Great Britain : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे उत्कृष्ट प्रदर्शन सुरु आहे. भारतीय हॉकी संघाने आज शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 4-2 असा पराभव करून सेमी फायनल गाठली आहे. त्यामुळे आता भारतीय हॉकी संघ मेडलपासून एक पाऊल दूर आहे. त्यामुळे आता भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे. (paris olympic 2024 indian hockey team beat great britain penalty shootout reach semi final) 

भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यात रंगलेल्या 60 मिनिटांच्या सामन्यात सामना 1-1  ने बरोबरीत सुटला होता. त्यामुळे आता शुटआऊटच्या माध्यमातून विजेता ठरवण्यात येणार होता. त्यानुसार भारताने शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 4-2 असा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

शुटआऊट बद्दल बोलायचं झालं तर,  शूटआऊटमधील पहिला प्रयत्न ब्रिटनने घेतला, तो यशस्वी ठरला. त्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत स्कोअर 1-1 अशी बरोबरीत आणला होता. ब्रिटनचा दुसरा प्रयत्नही यशस्वी झाला. त्यानंतर सुखजीतने गोल करत भारताची बरोबरी 2-2 अशी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Viral Video News : सेल्फीचा नाद पडला भारी! पुण्यातील तरुणी कोसळली दरीत, व्हिडीओ बघा

 शूटआऊटमधील पहिला प्रयत्न ब्रिटनने घेतला, तो यशस्वी झाला. त्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत स्कोअर 1-1 अशी बरोबरीत आणला. ब्रिटनचा दुसरा प्रयत्नही यशस्वी झाला. त्यानंतर सुखजीतने गोल करत भारताची बरोबरी 2-2 अशी केली. त्यानंतर ब्रिटेनने केले पुढील दोन गोल पीआर श्रीजेशने उत्कष्टरीत्या सेव्ह केले आणि भारत त्याच लाईनीत गोल करत राहिला आणि भारताने 4-2 ने शुटआऊटमध्ये हा सामना जिंकला. 

भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार पीआर श्रीजेश ठरला आहेत. कारण त्याने शुटआऊटमध्ये दोन महत्वपूर्ण गोल सेव्ह केवे होते. आणि अशाप्रकारे शुटआऊटमध्ये भारताने ग्रेट ब्रिटनचा 4-2 असा पराभव करून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या विजयामुळे भारतीय हॉकी संघ मेडलच्या एक पाऊल दुर आहे. आता हे मेडल भारत पटकावतो का? याकडे संपूर्ण भारतवासियांचे लक्ष लागले आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Anil Deshmukh : "...म्हणून देवेंद्र फडणवीसांनी 'तो' रिपोर्ट दडवून ठेवलाय"

    follow whatsapp

    ADVERTISEMENT