Anil Deshmukh : "...म्हणून देवेंद्र फडणवीसांनी 'तो' रिपोर्ट दडवून ठेवलाय"

योगेश पांडे

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख.
अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अनिल देशमुख यांचे फडणवीसांना आव्हान

point

सचिन वाझेचे नवे आरोप खोडले

point

चांदीवाल आयोगाच्या अहवालाचा मुद्दा

Anil Deshmukh Sachin vaze : अनिल देशमुखांना पीए मार्फत पैसे दिले जात होते, असा आरोप सचिन वाझेने केला. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले असल्याचेही सचिन वाझेने सांगितले. त्यानंतर आता अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगाच्या चौकशीच्या अहवालातील काही बाबी मांडल्या आहेत. त्याचबरोबर फडणवीसांनी तो अहवाल जनतेसमोर आणावा, असे आव्हानही दिले आहे. (Anil Deshmukh on Sachin Vaze's Statement)

अनिल देशमुख नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले, "माझ्यावर 3 वर्षापूर्वी परमबीर सिंग व सचिन वाझे याने माझ्यावर केलेल्या आरोपावर न्यायमूर्ती चांदीवाल यांनी ११ महिने चौकशी केली. या चौकशी दरम्यान दहशतवादी व दोन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सचिन वाझेने उलट चौकशीत स्पष्टपणे सांगितले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएने मला पैसे मागितले नाही आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाही. दोन खुनाच्या गुन्ह्यातील अरोपीच्या कुबड्यावर राजकीय सुडबुद्धीने देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली", असे  अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

ऐकीव माहितीवर आरोप

"न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या आयोगाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुद्धा आयोगासमोर बोलवले होते. परंतु सहा वेळा समन्स पाठवून सुद्धा ते आले नाहीत. शेवटी अटक वॉरंट काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी वकिलाच्या मार्फत शपथपत्र लिहून दिले की, मी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले ते ऐकीव माहितीवर केले आणि त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही", अशी माहिती देशमुख यांनी यावेळी दिली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फडणवीसांना अनेक वेळा पत्र दिले

"न्यायमूर्ती चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपाच्या चौकशीचा 1400 पानांचा अहवाल हा राज्य सरकारकडे 2 वर्षापूर्वी सादर केला आहे. परंतु दोन वर्षापासून तो अहवाल राज्य सरकार लोकांसमोर आणत नाही. यासाठी मी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तो अहवाल सार्वजनिक करण्याची विनंती केली", असेही देशमुख म्हणाले.

हेही वाचा >> "कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, कारण..."; आंबेडकरांचा ओबीसींना इशारा 

"दोन वर्षापूर्वी हा अहवाल राज्य शासनाला सादर झाला, त्यावेळी सर्वच वर्तमान पत्रामध्ये अनिल देशमुख यांना न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाकडून 'क्लीन चिट' दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु या अहवालात मला 'क्लीन चिट' दिल्यामुळे तो देवेंद्र फडणवीस यांनी दडवून ठेवला आहे", असा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> सासऱ्याने IRS अधिकारी असलेल्या जावयाला कोर्टातच घातल्या गोळ्या 

"दहशवादी व दोन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सचिन वाझे आता देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर जुनाच 3 वर्षापूर्वीचा आरोप करत आहे. मला जामीन देताना उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, सचिन वाझे हा 2 खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही."

ADVERTISEMENT

फडणवीसांना देशमुखांचे आव्हान

"न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या आयोगाने जेव्हा वाझेची उलट चौकशी केली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएने व कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले नाही किंवा मी दिले नाही. देवेंद्र फडणवीस यांची हिंमत असेल तर 3 वर्षापूर्वी माझ्यावर झालेल्या आरोपाचा न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने सादर केलेला चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा", असे आव्हान अनिल देशमुख यांनी फडणवीसांना दिले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT