PSL: 33 षटकार अन् 500 पेक्षा जास्त धावा, दोन संघानी मिळून बनवला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pakistan Super League : देशात एकीकडे वुमेन्स प्रिमियर लीग सूरू असताना, दुसरीकडे पाकिस्तानमध्ये पीएसएल(PSL) म्हणजेच पाकिस्तान सुपर लीग सुरु आहे. या लीगमध्ये खेळाडू अनेक रेकॉर्ड करत आहे. या खेळाडूंसह सघांकडून देखील अनोखे रेकॉर्ड होत आहे. या रेकॉर्डची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. हा अनोखा रेकॉर्ड नेमका काय आहे, ते जाणून घेऊयात. (psl 2023 quetta gladiators vs multan sultans most runs in t20 match usman khan fastest century)

ADVERTISEMENT

धावांचा पाऊस

पाकिस्तान सुपर लीगमध्ये 28 वा सामना मु्ल्तान सुल्तांस (Multan Sultans) आणि क्वेटा ग्लैडिएटर्समध्ये (quetta gladiators) रंगला होता. शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात धावांचा अक्षरश पाऊस पडला होता. मुल्तानच्या सु्ल्तांसनी 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 262 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या क्वेटा संघाने 8 विकेट गमावून 253 धावा केल्या. फक्त 9 धावांमुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. हा सामना पीएसएसमधला सर्वांत रोमांचक सामना होता.

Rohit Sharma: रोहितची धोनी, तेंडुलकरच्या क्लबमध्ये एन्ट्री, ठरला 6वा भारतीय

हे वाचलं का?

सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड

मुल्तानचे सु्ल्तांस (Multan Sultans) आणि क्वेटा ग्लैडिएटर्सने (quetta gladiators) मिळून या सामन्यात एकूण 515 धावा केल्या आहेत. इतक्या धावा आतापर्यंत टी20 मध्ये कोणत्याच संघाना करता आल्या नव्हत्या. याआधी 2022 मध्ये साउथ आफ्रिकेच्या टी20 चँलेजमध्ये टायटन्सआणि नाईट्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात दोन्ही संघानी 501 धावा केल्या होत्या. त्यावेळी टायटन्सने 271 आणि नाईटसने 230 धावा केल्या होत्या.

Ind vs Aus : अहमदाबाद कसोटी ड्रॉ झाली तर भारताचं काय होणार, कसं असेल WTCचं गणित?

ADVERTISEMENT

PSL मधला सर्वांत मोठा स्कोर

मुल्तानच्या सु्ल्तांसनी (Multan Sultans) 262 धावा तर क्वेटा संघाने 253 धावा केल्या होत्या. पहिल्यांदा असे झाले की धावांचा पाठलाग करताना एखाद्या संघाने 250 चा आकडा गाठलाय. 2016 ला न्युझीलंडची स्थानिक टीम सेंन्ट्रल डिस्ट्रीक्टने ओटागो विरूद्ध धावांचा पाठलाग करताना 248 धावा केल्या होत्या.

ADVERTISEMENT

262 धावा हा पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) इतिहासातील सर्वांत मोठा स्कोर आहे. याआधी पीएसएसलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड इस्लामाबादच्या युनायटेडच्या नावे आहे. 2021 ला इस्लामाबादच्या टीमने क्वेटा ग्लैडिएटर्स विरूद्ध 2 विकेट गमावून 247 धावा केल्या होत्या. या सामन्यात क्वेटाचा गोलंदाज कैस अहमदने 4 ओव्हरमध्ये 77 धावा दिल्या. जी पीएसएलच्या इतिहासात सर्वांत महागडी ओव्हर ठरली होती.

असा रंगला सामना

मुल्तान संघाने (Multan Sultans) टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुल्तान संघाने चांगली सुरुवात केली. उस्मान आणि रिजवान 1 0 ओव्हरमध्ये 157 धावांची पार्टनरशीप केली. या सामन्यात उस्मानने 36 धावात शतक ठोकले. हे पीएसएसमधलं सर्वांत वेगवान शकत ठरलं. तर रिजवाने 55, डेविडने 43 आणि पोलार्डने 23 धावा ठोकल्या होत्या. या बळावर त्यांनी 262 धावांचा डोंगर उभारला. 262 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या क्वेटाच्या युसुफने 67 आणि इफ्तिखार अहमदने 53 सर्वाधिक धावा ठोकल्या. या संघाने 8 विकेट गमावून 253 धावा केल्या. फक्त 9 धावांमुळे त्यांना हा सामना गमवावा लागला. हा सामना पीएसएसमधला सर्वांत रोमांचक ठरला आहे.

Shaun Marsh retirement : ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडू शॉन मार्शने घेतली निवृत्ती

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT