पी.व्ही सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी; राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदा मिळवलं गोल्ड
भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू हिने कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये आपली चमक दाखवली आहे. एकेरीच्या अंतिम सामन्यात तिने कॅनडाच्या जागतिक क्रमवारीत १३व्या क्रमांकावर असलेल्या मिशेल लीचा सलग दोन गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरती असलेल्या पीव्ही सिंधूने पहिला गेम २१-१५ असा जिंकला तर दुसरा गेम २१-१३ असा जिंकला आहे. पहिल्या गेममध्ये मिशेलने जबरदस्त खेळ […]
ADVERTISEMENT
भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू हिने कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये आपली चमक दाखवली आहे. एकेरीच्या अंतिम सामन्यात तिने कॅनडाच्या जागतिक क्रमवारीत १३व्या क्रमांकावर असलेल्या मिशेल लीचा सलग दोन गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरती असलेल्या पीव्ही सिंधूने पहिला गेम २१-१५ असा जिंकला तर दुसरा गेम २१-१३ असा जिंकला आहे. पहिल्या गेममध्ये मिशेलने जबरदस्त खेळ दाखवला मात्र दुसऱ्या गेममध्ये सिंधूने तिला संधी दिली नाही. दुसरा गेम भारताच्या स्टार खेळाडूने २१-१३ असा जिंकला. यासह सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेतील एकेरीत पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.
ADVERTISEMENT
???? ????????? ?????. ???? ?? ????? ??? ???? ?????? ?????!@Pvsindhu1 shines bright winning her maiden #cwg ? in the Women’s singles ? defeating Michelle Li of ?? in straight sets @birminghamcg22 #EkIndiaTeamIndia #B2022 pic.twitter.com/qf56Y4VI8A
— Team India (@WeAreTeamIndia) August 8, 2022
सिंधूने प्रथमच राष्ट्रकुल जिंकले सुवर्ण
दोन वेळची ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेल्या पीव्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत २०१४ मध्ये कांस्य आणि २०१८ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. सिंधूने या मोसमात मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. तर २०१८ राष्ट्रकुलमध्ये सिंधूने मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
सिंधूने आतापर्यंत ८ सामन्यात मिशेलवर केली मात
पीव्ही सिंधू आणि मिशेल ली या सामन्यापूर्वी १० वेळा आमनेसामने आल्या होत्या. यामध्ये पीव्ही सिंधूने ८ वेळा सामना जिंकला होता, तर मिशेलने दोन वेळा विजय मिळवला होता. आता सिंधूने ९व्यांदा मिशेलचा पराभव केला आहे. भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधू यावेळीही चमकदार खेळ करत आहे. पीव्ही सिंधूने राष्ट्रकुल २०२२ च्या उपांत्य फेरीत सिंगापूरच्या वाई जिया मिनचा पराभव केला होता. सिंधूने हा सामना २१-१९, २१-१७ असा जिंकला होता.
हे वाचलं का?
पदकतालिकेत भारताची सद्यस्थिती
भारताने १०व्या दिवशी म्हणजे रविवारी एकूण १५ पदके जिंकली, तरीही भारत पदकतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात १९ सुवर्ण, १५ रौप्य आणि २२ कांस्य पदकं आहेत. ऑस्ट्रेलियाने ६६ सुवर्ण, ५५ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, यजमान इंग्लंड ५५ सुवर्ण पदकांसह दुसऱ्या तर कॅनडा २२ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर १९ सुवर्ण पदकांसह न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे, भारतापेक्षा एक स्थान वर आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT