राजवर्धन हंगरगेकरला भोगावी लागणार शिक्षा?; BCCI ची फसवणूक केल्याचं प्रकरण
१९ वर्षाखालील विश्व चषकातील कामगिरीमुळे चर्चेत आलेला आणि आयपीएलमध्ये तब्बल दीड कोटींची बोली लागलेला महाराष्ट्राचा युवा क्रिकेटपटू वादात राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) मोठ्या वादात अडकला आहे. कमी वय दाखवून राजवर्धन हंगरगेकरने बीसीसीआयची फसवणूक केल्याचा आरोप असून, राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. (Rajvardhan Hangargekar accused of age […]
ADVERTISEMENT
१९ वर्षाखालील विश्व चषकातील कामगिरीमुळे चर्चेत आलेला आणि आयपीएलमध्ये तब्बल दीड कोटींची बोली लागलेला महाराष्ट्राचा युवा क्रिकेटपटू वादात राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) मोठ्या वादात अडकला आहे. कमी वय दाखवून राजवर्धन हंगरगेकरने बीसीसीआयची फसवणूक केल्याचा आरोप असून, राज्याच्या क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. (Rajvardhan Hangargekar accused of age fraud)
ADVERTISEMENT
दरम्यान, या प्रकरणात ‘मुंबई Tak’शी बोलताना उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी त्यात जन्म तारखेत खाडाखोड केली असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता राजवर्धनला शिक्षेला सामोरं जावं लागण्याची शक्यता वाढली आहे.
मूळचा उस्मानाबाद जिल्ह्याचा रहिवासी असलेला वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर अलिकडेच अंडर १९ वर्ल्डकपमध्ये खेळला आहे. मात्र, यावरूनच तो वादात अडकला आहे. राजवर्धनच्या मुळ जन्मतारखेनुसार १९ वर्षाखालील विश्वचषकात खेळताना त्याचं वय २१ वर्ष इतकं होतं. राजवर्धनने मूळ वय लपवून बीसीसीआयची फसवणूक केल्याचा आरोप असून, क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला तसं पत्र पाठवलं आहे.
हे वाचलं का?
ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात राजवर्धन हंगरगेकरने शाळेच्या जन्म दाखल्यात फेरफार करून जन्म तारीख बदलली असल्याचं म्हटलं आहे. शाळेतील नोंदीनुसार पहिली ते सातवीपर्यंत राजवर्धनची जन्म तारीख १० जानेवारी २००१ आहे. मात्र, आठवीमध्ये प्रवेश घेताना मुख्याध्यापकांनी ही तारीख बदलून १० नोव्हेंबर २००२ अशी केलेली आहे.
पाच सदस्यीय समितीच्या चौकशीत काय आढळलं?
ADVERTISEMENT
राजवर्धन हंगरगेकरच्या जन्मतारखेची चौकशी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी पाच सदस्यी समिती नेमली होती. या समितीने अहवाल सादर केलेला आहे. त्या अहवालानुसार राजवर्धन सुहास हंगरगेकर याची याची उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूल (प्राथमिक विभाग) शाळेतील इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेताना जन्मतारीख १० जानेवारी २००१ अशी नोंदवलेली आहे.
ADVERTISEMENT
इयत्ता सातवीपर्यंतच्या शाळेतील नोंदीनुसार त्याची जन्मतारीख १० जानेवारी २००१ अशीच आहे. दरम्यान, तेरणा पब्लिक स्कूल (माध्यमिक विभाग) या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवायच जनरल रजिस्टरमध्ये खाडाखोड करून जन्मतारीक १० नोव्हेंबर २००२ अशी केली. जन्मतारखेत बदल केल्यानंतर विद्यार्थ्याला २६ जून २०१७ मध्ये १० उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला.
समितीने केलेल्या पडताळणीनुसार हंगरगेकर याची जन्मतारीख १० नोव्हेंबर २००२ नसून, १० जानेवारी २००१ अशीच असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातील अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच ओमप्रकाश बकोरिया यांना पाठवलेला आहे.
काय होऊ शकते शिक्षा?
बीसीसीआयने दोषी ठरवल्यास राजवर्धन हंगरगेकरला शिक्षा भोगावी लागू शकते. बीसीसीआयने २०२०मध्ये काढलेल्या आदेशानुसार एखाद्या खेळाडूने बनावट कागदपत्राद्वारे सादर करून वयात फेरफार केल्याचं सिद्ध झाल्यास त्याच्यावर दोन वर्षांसाठी बंदी घातली जाऊ शकते. असं झाल्यास आयपीएलमध्ये खेळण्याची संधीही हिरावली जाऊ शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT