कसोटीत सर्फराज खाननं ठोकलं पहिलं शतक! 16 चौकार अन् 3 गगनचुंबी षटकार...'असा' Video कधी पाहिला नसेल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sarfaraz Khan 1st Test Century Viral Video
Sarfaraz Khan 1st Test Century
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सर्फराज खानने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा उडवला धुव्वा

point

सर्फराजच्या धमाकेदार फलंदाजीचा व्हिडीओ व्हायरल

point

सर्फराज खानने टेस्टमध्ये ठोकलं पहिलं शतक, व्हिडीओ एकदा पाहाच

Sarfaraz Khan First Century In Test Cricket Video : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमध्ये खेळवला जात आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव 402 धावांवर आटोपल्यानंतर दुसऱ्या डावात भारताची अवघ्या 46 धावांवर दाणादाण उडाली होती. त्यानंतर भारताने जबरदस्त कमबॅक करून 71 षटकांत 3 विकेट्स गमावून 344 धावा केल्या. परंतु, आज चौथ्या दिवशी पावसाने खोडा घातल्याने सामना काही काळ थांबवण्यात आला आहे. सर्फराज खानने टेस्ट क्रिकेटमधील पहिलं शतक ठोकलं असून तो 125 धावांवर नाबाद आहे. यामध्ये 16 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज सर्फराज खानने चौकार-षटकारांचा पाऊस पाडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं शतक झळकावलं आहे. सर्फाराजच्या आक्रमक फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

ADVERTISEMENT

सर्फराज खानचं टेस्ट करिअर

सर्फराज खान भारतीय क्रिकेट संघासाठी आज 19 ऑक्टोबर 2024 ला चौथा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात सर्फराजने 7 इनिंगमध्ये 300 धावा केल्या आहेत. सर्फराजच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतक आहेत. 

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! दिवाळी बोनस नक्की मिळणार का? सरकारने दिली मोठी अपडेट

सर्फराज खानचं फर्स्ट क्लास क्रिकेट करिअर 

सर्फराजने फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरमध्ये 51 सामन्यांमध्ये 76 इनिंगमध्ये 69.09 च्या सरासरीनं 4422 धावा कुटल्या आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्फराजच्या नावावर 15 शतक आणि 14 अर्धशतकांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक 301 धावांच्या नाबाद खेळीचाही समावेश आहे.

हे वाचलं का?

सर्फराजचं लिस्ट ए करिअर

युवा फलंदाज सर्फराजने लिस्ट ए क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत एकूण 37 सामने खेळले आहेत. यामध्ये 27 इनिंगमध्ये 34.94 च्या सरासरीनं 629 धावा केल्या आहेत. लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर 2 शतक आहेत.

हे ही वाचा >> Today Gold Rate: बाईईई...दिवाळीआधीच सोनं गडगडलं! मुंबईसह 'या' 15 शहरांमध्ये 1 तोळ्याचा दर काय?

टी-२० मध्ये सर्फराजची अप्रतिम कामगिरी

सर्फराज खानने टी-20 फॉर्मेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या फॉर्मेटमध्ये त्याने एकूण 96 सामने खेळले आहेत. यामध्ये 74 इनिंगमध्ये 22.41 च्या सरासरीनं 1188 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये सर्फराजच्या नावावर 3 अर्धशतक आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT