Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांचा राजीनामा
भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या शर्यतीत भारतीय महिलांना ग्रेट ब्रिटनकडून ४-३ ने पराभव स्विकारावा लागला. टीम इंडियाच्या Analytical Coach जानेक स्कोपमन या भारताच्या नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील असे संकेत सध्या मिळत आहेत. टोकियोमध्ये भारतीय महिलांचा सामना संपल्यानंतर पत्रकारांसोबत व्हर्च्युअल संवाद साधत […]
ADVERTISEMENT
भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या शर्यतीत भारतीय महिलांना ग्रेट ब्रिटनकडून ४-३ ने पराभव स्विकारावा लागला. टीम इंडियाच्या Analytical Coach जानेक स्कोपमन या भारताच्या नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील असे संकेत सध्या मिळत आहेत.
ADVERTISEMENT
टोकियोमध्ये भारतीय महिलांचा सामना संपल्यानंतर पत्रकारांसोबत व्हर्च्युअल संवाद साधत असताना मरीन यांनी आपण काम सोडत असल्याची माहिती दिली. कोरोना महामारी आणि त्यामुळे लागलेल्या लॉकडाउनमध्ये मरीन गेल्या दीड वर्षांपासून आपल्या घरी जाऊ शकले नव्हते.
“माझ्यासमोर आता कोणतेही प्लान्स नाहीयेत, कारण भारतीय महिला हॉकी संघाचा कोच म्हणून ही माझी शेवटची मॅच होती. आता पुढचं सगळं जेनेकच्या हाती असेल. मला या संघाची खूप आठवण येईल. पण मला माझ्या परिवाराचीही आठवण येते आहे. माझ्यासाठी माझा परिवार हे पहिलं प्राधान्य आहे. गेली तीन ते साडेतीन वर्ष मी माझी पत्नी, मुलगा, मुलगी यांना भेटलो नाही. माझ्या प्रवासाचा हा एका अर्थाने सुंदर अंत आहे.” मरीन यांनी आपली भूमिका मांडली.
हे वाचलं का?
२०१७ साली जोर्द मरीन यांची भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. परंतू काही महिन्यांमध्येच मरीन यांना पुरुष हॉकी संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. २०१८ साली मरीन पुन्हा एकदा महिला संघाचे कोच म्हणून परत आहे आणि ग्रॅहम रिड यांना पुरुष हॉकी संघाची जबाबदारी देण्यात आली.
Tokyo Olympics 2020: स्वप्नभंग ! ब्रिटनची भारतीय महिलांवर मात, भारताचं पदक हुकलं
ADVERTISEMENT
जोर्द मरीन आणि जेनेक स्कोपमन यांना ‘साई’ने (Sports Authority of India) ने मुदतवाढ देण्याची तयारी दाखवली होती. परंतू मरीन यांनी ही ऑफर नाकारली आहे. जेनेक स्कोपमन या भारतीय हॉकी संघासाठी कोच म्हणून योग्य उमेदवार असल्याचंही मरीन यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT